तालुक्याला पावसाचा तडाखा कायम : पोहण्यासाठी गेलेला युवक बेपत्ता : शोधकार्य सुरू


म्हसळा तालुक्याला पावसाचा तडाखा कायम : पोहण्यासाठी गेलेला युवक बेपत्ता : शोधकार्य सुरू

म्हसळा (निकेश कोकचा)

म्हसळा शहरासहित संपूर्ण तालुक्यात पावसाचा तडाखा कायम असून बुधवारी संतधार पावसामध्ये शहरातील जानसई नदीने रुद्र अवतार घेतला आहे.नदीने धोक्याची पातळी ओलांडली असताना देखील या नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेला एक २३ वर्षीय युवक बेपत्ता असून,त्या युवकाचा शोध सुरू आहे.
मागील चार दिवसांपासून म्हसळा शहरासहित तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे.त्यामुळे तालुक्यातील नद्यां व खाडी लगत असणार्‍या गावांमध्ये पुरसदृश्य स्थिति निर्माण झाली आहे.म्हसळा शहरातील जानसई नदीने रुद्र अवतार घेतला असल्याने शहरात देखील पुराचा पाणी शिरला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.जानसई नदीवर असणार्‍या शहरातील पाभरा पुलावर काही युवक पोहण्यासाठी गेले होते.नदीने रुद्र आवतर घेतला असताना देखील,नदीवर असणार्‍या उंच पूलावरून थेट नदीत हे युवक पोहण्यासाठी उड्या मारत होते.या युवकांमध्ये बदर अब्दल्ला हळदे या  २३ वर्षीय युवकाने नदीत उडी मारल्यानंतर तो वाहून गेला आहे. या युवकाचा शोध रेस्क्यू टिम कडून सुरू असून अद्याप तो बेपत्ता आहे.

मागील चार दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे.प्रशासनाने व नगरपंचायतीने या बाबत कोणतीही पूर्वतयारी केली नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.बदर हळदे हा युवक वाहून गेल्या नंतर प्रशासनाला जाग आली असून पाण्याच्या प्रवाहात जाऊ नये,आवश्यक असल्यास घराबाहेर पडा असे आवाहन म्हसळा तहसील कार्यालया मार्फत करण्यात आले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा