म्हसळा कराना दिलासा देणारी बातमी
म्हसळा नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाला तब्बल ११ वर्षानी सापडला मुहुर्त : आता लक्ष देण्याची वेळ नगरपंचायत प्रशासन व जनतेची.
संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा नळ पाणी पुरवठा योजना (पाभरे डॅम) म्हसळा करांसाठी २००८-९ मध्ये तत्कालीन पालक मंत्री सुनील तटकरे यानी मंजुर केली होती. ठेकेदार व प्रशासनाचे हलगर्जीपणामुळे योजना सतत बंद पडत असे, निकृष्ट व वेळकाढूपणामुळे तब्बल २-३ वेळा ठेकेदार बदलण्यात आले लोकप्रतिनिधींच्या आग्रहामुळे एकाच योजनेचे भूमिपूजनही दोन वेळा (ग्रामपंचायत व नगरपंचायत ) झाले परंतु म्हसळा नगरपंचायतीला नळ योजनेचे कामाला मूहूर्त सापडत नव्हता तो आता सापडला आहे, नव्यानेच काही दिवसा पूर्वी योजनेचे काम सुरु झाले आहे.
राष्ट्रीय पेयजल योजने अंर्तगत सुमारे १कोटी ४० लक्ष रुपये किंमतीची म्हसळा नगरपंचायतीतील दुर्गवाडी, चिराठी, सावर, आदीवासी वाडी हा परिसर सोडून उर्वरीत भागासाठी ही योजना होणार आहे. योजनेत ६ इंच (१५०mm) ची ५२०० मीटर लाईन पाभरे ते म्हसळा येणार आहे.ती सुमारे रु १ कोटी चीआहे. सब मर्सीबलपंप व पंप हाऊस रु २.९० लक्ष , बेलदार वाडी साठी स्वतंत्र साठवण टाकी ३.२७ लक्ष, शहराअंर्तगत सुमारे ७०० मीटर वितरण व्यवस्था रु ४.४३ लक्ष, फिल्टरेशन प्लँट दुरुस्ती, वारेकोंड व नवे नगर येथील पाण्याचे टाकींच्या दुरुस्त्या,अशा अनेक कामांची सदर योजनेत तरतुद आहे.
या योजनेच्या माध्यमांतून पाभरे डॅममथून ३०HP च्या सबमर्सीबल पंपाने लिफ्टने पाणी म्हसळा (आदीवासी वाडी) येथील साठवण टाकीत आणणे (रोज सुमारे ४ते ५ लक्ष लीटर) व संपूर्ण म्हसळा शहरांत एकाच दाबाने व सर्वत्र समप्रमाणात ग्रॅव्हीटीने पाणी पुरवठा करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे या योजनेमुळे म्हसळा शहरांतील कन्याशाळा परीसर, विद्यानगरी,ब्राह्मण आळी,सानेआळी, साळीवाडा, तांबट आळी, सोनार आळी, नवे नगर, तहसील- पोलीस कार्यालय, दिघी नाका, ग्रामिण रुग्णालय, तहसील निवासस्थान,पंचायत समित कार्यालय, कुंभारवाडा, बेलदार वाडी ,इदगाह अशा बहुतांश परिसरांत योग्य दाबाने व मुबलक पाणी पुरवठा होणार आसल्याचे प्रशासन म्हणते. तब्बल ११ वर्षानी सुरवात होणारी ही योजना निकृष्ट दर्जाची होण्यापेक्षा नगरपंचायत प्रशासन , पाणी सघर्ष समिती व स्थानिक जनतेने विशेष लक्ष घालून निकष व नियमांचे पालन करून घेणे भविष्यासाठी योग्य ठरेल असे शहरांतील जाणकारांचे मत आहे.
"म्हसळा नळ पाणी पुरवठा योजना ही २००८-९ ला निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर मंजुर झाली, लोकसभा, विधानसभा, नगरपंचायतीवर उमेदवार निवडून आले, आता जुनीच योजना नव्याने सुरु होत आहे ती पण नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर होत आहे.म्हसळा शहराचा होणारा विस्तार, पर्यटकांचीगर्दी, त्यादृष्टीने होणाऱ्या या योजनेला निधी अपुरा पडेल हे निश्चित पर्यायाने कामे निकृष्ट होतील व पुन्हा पाणी टंचाई असे भविष्यांत होईल"
रफीक चणेकर, माजी सरपंच ग्रामपंचायत म्हसळा
" म्हसळा पाणी योजनेची शहरांतील संपूर्ण वितरण व्यवस्था (व्हॉल्व्ह सह ), व फिल्टरेशन प्लँट ही गेली २५ वर्षे म्हणजे सुखातीपासून सदोष (वितरण व्यवस्था )व बंद (फिल्टरेशन प्लँट)आहे ती दुरुस्त न करता पूर्णपणे नवीन होणे आवश्यक आहे"
सचिन करडे, संस्थापक,गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान व सचिव पाणी संघर्ष समिती म्हसळा.
" ही योजना जुनी आहे, ज्याप्रमाणे Esitimate आहे त्या प्रमाणे दर्जेदार व निकषाप्रमाणे काम होईल, अडचणी न आल्यास गणपती पर्यंत म्हसळा शहरातील साठवण टाकीत पाणी येईल प्रशासनाला सहकार्याची अपेक्षा आहे"
युवराज गांगुर्डे, उप- अभियंता
ग्रा.पा.पु.विभाग श्रीवर्धन -म्हसळा.
Post a Comment