श्रीवर्धन शहरातील महेश्वर आळीतील रस्ता धोकादायक : नाल्याची दगड निखळन्यास सुरुवात ; अपघाताची शक्यता वाढली
श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
जून च्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात श्रीवर्धन मध्ये पाऊसाने जोर पकडला आहे. ०४ऑगस्ट ते ०७ ऑगस्ट या चार दिवसात जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. श्रीवर्धन मधील महेश्वर आळीतील वाहतुकीचा मुख्य रस्ता धोकादायक झाला आहे. मुख्य रस्त्याच्या लगत असलेल्या नाल्याचे बांधकाम ढासळत आहे. त्यामुळे पर्यायाने मुख्य रस्ता वाहतुकीस धोकादायक ठरत आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महेश्वर प्रभागाची लोकसंख्या ३५०च्या जवळपास आहे. श्रीवर्धन शहरातील विविध भागातून पावसाच्या पाण्याचा प्रवाह महेश्वर आळीतील नाल्याकडे येतो व त्या नंतर तो समुद्रात जातो . महेश्वर आळीतील नाल्याचे बांधकाम जुने झाले आहे. नाल्याची खोली अंदाजे ०६ फुटा पेक्षा जास्त असल्याचे दिसून येत आहे. व रुंदी अंदाजे ०५फुटाच्या जवळपास आहे. महेश्वर आळीतील वळण रस्त्यावरून अमर गुरव यांच्या घरा पर्यंत नाल्याला संरक्षण भिंत किंवा कठडा नसल्याने दुचाकी स्वार व पादचारी अनेकदा अपघात ग्रस्त झाले आहेत. नाल्याचा लगतच्या रस्त्याची रुंदी अंदाजे ७ फुटाच्या जवळ पास आहे. रस्त्याच्या एका बाजूला नाला व दुसऱ्या बाजूला विद्युत वाहक खांब आहेत . तसेच लगतच वाडी आहे त्यामुळे रात्री सदरच्या रस्त्यावरून जाणे येणे धोकादायक झाले आहे. या वर्षी पाऊस पडण्याचे प्रमाण कमी न झाल्यास सदरचा पुर्ण नाला ढासळ्यास महेश्वर आळीतील अनेक घरात पाणी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच वाहतूक मार्ग पुर्ण बंद होईल असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. श्रीवर्धन शहरातील विविध प्रभागातील लोक जीवना बंदरा कडे मासळी खरेदी विक्रीसाठी महेश्वर पाखाडी तील रस्त्याचा नियमित वापर करत आहेत. महेश्वर पाखाडी तील रहिवाशी वर्गातुन नाल्याचे काम जलद गतीने होण्याची मागणी जोर धरत आहे.
महेश्वर पाखाडीतील नाल्याचे काम अनेक दिवसा पासून प्रलंबित आहे. आता नाल्याचे दगड निघण्यास सुरुवात झाली आहे. लवकर काम केले नाही तर पुर्ण रस्ता वाहून जाण्याची शक्यता आहे त्यामुळे नगरपरिषदेने लवकर काम करावे ही विनंती.... बंटी नलावडे (रहिवाशी महेश्वर आळी )
महेश्वर पाखाडीतील नाल्याला संरक्षण कठडा बसवण्यात यावा व मुख्य रस्ता रुंदी करणं करावे या साठी अनेकदा निवेदने दिली आहेत मात्र अद्याप काम झालेले नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही... विश्वास कोसबे ( महेश्वर पाखाडी अध्यक्ष )
महेश्वर आळीतील नाल्यात या पूर्वी दुचाकी स्वार व पादचारी पडून अपघात झालेला आहे. त्यामुळे सदरच्या नाल्याचे काम लवकरात लवकर करावे ही मागणी आहे... सैमिल साठे (रहिवाशी महेश्वर आळी )
Post a Comment