किरण काशिराम शिंदे/लोणेरे
संपूर्ण जगात सध्या कोरोनाने थैमन घातले असताना जनजीवन विस्कळित होऊन पूर्णत ठप्प झाले. आहे आणि त्यातच रायगड जिल्हामध्ये निसर्ग चक्रीवादळाने थैमान घातल्यामुळे लोकांचं आतोनात नुकसान झालं आहे. तसेच या काळात जवळ जवळ एक महिना विद्युत प्रवाह बंद होता तरी सुद्धा अशा परिस्थितीत महावितरण ने लोकांना भरमसाठ अवाजवी बिल पाठविली आहेत तर आधीच मेटाकुटीला आलेल्या जनतेला एक मोठ्या संकटात टाकण्याचं काम केले आहे या बाबतीत जनते मधून तीव्र नाराजी व संताप व्यक्त होत आहे या गोष्टी कडे कोणताही लोक प्रतिनिधी किंवा स्थनिक पुढार्यानचे लक्ष नाही. आता पुढारी गप्प का अशी चर्चा जाणतेतून ऐकायला मिळत आहे. सामान्य जनतेला जर न्याय मिळत नसेल तर उपयोग काय अशी जनता प्रश्न विचारताना दिसत आहे. सामान्य जनतेला आता कोण वालीच उरला नाही. याचाच एक भाग म्हणून कुणबी युवा मंच लोणेरे गोरेगाव विभाग सामन्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्या साठी अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा ठेवून प्रयत्नशील आहे. नागरीकांना न्याय मिळवून देणार असून संघटनेने आता जनतेसाठी लढण्याची भूमिका घेतली आहे. वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची भूमिका कुणबी युवा मंचाची आसल्याची बोलून दाखविले आहे .या संदर्भातील पाहिलं पाऊल म्हणून कुणबी युवा मंचाच्या शिष्टमंडळाने एक निवेदन महावितरण कंपनीच्या गोरेगाव कार्यालयाला दिलेलं आहे. आणि हि बाब खासदार, रायगड पालकमंञी, स्थानिक आमदार निदर्शनास आणून या संदर्भात लोकप्रतिनिधींनी जनतेच्या हिताचे महावितरण ने वीजबिलात 50% सुट द्यावी व सणासुदीत जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. या विषयी योग्य दखल न घेतल्यास लोकशाहीच्या मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा लोणेरे गोरेगाव कुणबी युवा मंचाच्या वतीने देण्यात आले आहे अशी माहिती संघटनेच्या शिस्टामंडळाने प्रतिनिधींना दिली.
Post a Comment