राष्ट्रीय लढाऊ कामगार नेते कोकण सुपुत्र कॉ.बाळकृष्ण हिराजी चाळके साहेब टपाल सेवेतून सेवानिवृत्त ,अखंड देशातून अभिनंदन वर्षाव...!
प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
टपाल खात्यातील कामगारांच्या हृदयावर अधिराज्य करणारे कर्मवीर श्री. बाळकृष्ण चाळके साहेब हे केंद्रीय टपाल विभागाच्या ऑल इंडिया पोस्टल युनियनचे बलाढ्य कामगार नेते! शिस्त,कार्यकुशलता,अमोघ वक्तृत्वशैली,लढवय्येपणा याच्या जोरावर कामगारांच्या अन्यायाला न्याय मिळवून देणं.प्रशासनाशी उत्तम हाताळणी , कामगार कायद्याची जाणं असणारे नेते हे वयाच्या साठाव्या वर्षी यशस्वी सेवेचा कार्यकाळ पूर्ण करून निवृत्त झाले.1990चा पोस्टातील रोजंदारी कामगारांच्या प्रश्नासाठी त्यांच्या सहकार्यांसह प्राणांतिक उपोषण करून हजारो लोकांना खात्यात समाविष्ट करण्यास शासनाला भाग पाडले.उत्तम संघटन कौशल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुखं दुःखाच्या जाणीवेमुळे त्यांची महाराष्ट्र संघट्नप्रमुख म्हणून निवड झाली.पुढे त्यांनी अनेक वेळा राष्ट्रीय स्थरावर नेतृत्व करून टपाल विभागातील अनेक समस्या सोडवून कामगारांना न्याय मिळवून दिला.मुंबई पोस्टल सोसायटी या कामगार हितासाठी इंग्रजांनी सन 1914 साली स्थापन केलेल्या बहुस्तृत सोसायटीच्या पॅनलवर अनेक वेळा निवडून आले. त्यात त्यांनी सभासदांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या.असा बहुचर्चित कामगार नेता सेवानिवृत्त होत असताना महाराष्ट्रासह अखंड देशातून त्यांच्यावर सर्व स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
Post a Comment