संजय खांबेटे : म्हसळा
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ(शिवाजीराव पाटील गट)श्रीवर्धन शाखेच्या नुतन कार्यकारिणीची नियुक्ती जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 30 जुलै 2020 रोजी संपन्न झाली.प्राथमिक शिक्षक संघ श्रीवर्धन शाखा अध्यक्षपदी प्रमोद जगदाळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली नुतन कार्यकारिणीत सचिव पदी इंद्रजित साळुंखे,कार्याध्यक्ष राजेश तोडणकर,कोषाध्यक्ष विजय काचुळे, कार्य.चिटणीस अमोल कदम,जिल्हा उपाध्यक्ष भास्कर पांगारकर यांची निवड करण्यात आली.म्हसळा तालुक्या पाठोपाठ आज श्रीवर्धन तालुक्याची नूतन कार्यकारणी स्थापन करण्यात आली.या वेळी सुर्यकांत करंजीकर चेअरमन पेण प्राथ.शिक्षक सह.,देवानंद पिंगळे व्हा.चेअरमन,जीवन तेलंगे जिल्हा सचिव नरेश सावंत तालुकाध्यक्ष म्हसळा शिक्षक संघ,सचिन कदम- अध्यक्ष माणगाव,जगदीश म्हात्रे- जिल्हा सहसचिव,अजय पाटील,खैरे सर,विनायक पारधी उपस्थित होते.कार्यकारणी निवडी समयी असंख्य शिक्षक बंधु- भगिनींनी शिक्षक संघाच्या कार्यप्रणालीवर आणि राजेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वपणालीवर विश्वास दाखवून शिक्षक संघाला पाठिंबा दिला.नवनियुक्त कार्यकारणीने निवड होताच गटविकास अधिकारी प्रविण शिनारे,ग.शि.अ. नुरमोहम्मद राऊत,श्री केदारराव यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबतीत चर्चा करण्यात आली.नवनियुक्त प्राथमिक शिक्षक संघ श्रीवर्धन कार्यकारणीचे तालुका सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी,शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Post a Comment