( म्हसळा प्रतिनिधी)
म्हसळा शहरांत व तालुक्यांत कोरोनाचा कहर झाला आहे. कोरोनो पॉझीटीव्ह रुग्ण इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बरे होत असले तरी एकूणच आरोग्य विभागाच्या अनागोंदी व ढीसाळ कारभारामुळे तालुक्यातील जनता प्रशासन व पालक मंत्र्यायावर नाराज झाली आहे. तालुक्यात आजपर्यंत ७ पॉझीटीव्ह रुग्ण मृत झाले आहेत तर बाधीतांची संख्या १११ झाली आहे. दोन दिवसांत १०कोरोना+ रुग्ण सापडले आहेत ४८रग्ण उपचार घेत आहेत.५६ पॉझीटीव्ह रुग्ण इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बरे झाले आहेत. तालुक्यातील ग्रामिण रुग्णालय व जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेचा ढीसाळ कारभारामुळे तालुक्याचे आरोग्यावर शासनाचे दुर्लक्ष होत आहे.
असा आहे ढीसाळ कार्यक्रम
१ )तालुक्यात ग्रामिण रुग्णालय व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नाही.
२) ग्रामिण रुग्णालय म्हसळ्या साठी पूर्णवेळ कार्यक्षम अधिक्षक असावा
३ ) रुग्ण वाहिका नसल्यामुळे अनेक वेळा रुग्ण दोन- दोन दिवस घरांत असतात त्यामुळे लागण वाढते
४) तालुक्यांत C.C.C तात्काळ सुरु होणे गरजेचे आहे.
५) संशयीत अगर लागण झालेले स्वॅब घेतलेले आरोग्य विभागाचे कर्मचारी अनेक वेळा नागरीकांच्यात सहभागी होतात
६) कोरोना+ रुग्ण मोठया संखेने असणाऱ्या शहरांत व ग्रामिण भागातून स्कॅनींग व पत्स् (ऑक्सीमीटर) तपासणी होणे आवश्यक आहे.
७) ग्रामिण रुग्णालय व नगरपंचायत यामध्ये समन्वय असणे जरुरीचे
" श्रीवर्धन मतदारसंघातील मेदडी प्रा.आ.केंद्रातील मुख्यालय आरोग्य सेविका कोरोना लक्षणांमुळे बाधीत होऊन सुद्धा व कोरोना +येऊनही तब्बल दोन -तीन दिवस रुग्ण वाहिका नसल्याने घरातच होती हे दुर्देव मतदार संघाचे आहे."
महादेव पाटील, तालुका प्रमुख. शिवसेना म्हसळा तालुका
Post a Comment