(म्हसळा प्रतिनिधी )
सन 2020 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा म्हसळा तालुका केंद्राचा निकाल 88.61% लागला आहे.या वर्षी 12 वी मध्ये विध्यार्थी पास होण्याच्या संख्येत वाढ झाली आहे.म्हसळा तालुका केंद्रात 12 वी च्या एकुण 808 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती पैकी नियमीत 717 तर रिपीटर 21 असे मिळुन एकुण 737 विध्यार्थी पास झाले .म्हसळा न्यु इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा एकूण निकाल 93.30% इतका लागला आहे.कॉलेजचा वाणिज्य शाखेचा निकाल 98.76 % तर कला शाखेचा निकाल 85.04 % इतका आहे,अंजुमन इस्लाम जंजिरा कॉलेज म्हसळा चा 12 वी चा निकाल 99.54% इतका आहे कॉलेज मधील कला व शास्त्र शाखेचा निकाल 100 % तर वाणिज्य शाखेचा निकाल 99.13% इतका आहे.अंजुमन कॉलेज गोंडघर 93.44% या कॉलेज मध्ये कला शाखेचा 81.81 तर वाणिज्य शाखेचा निकाल 100% आहे.सुरैया अली कौचाली हायस्कूल पांगलोली शास्त्र शाखेचा निकाल 97.56%इतका आहे.हायर एसइसी विद्यालयाचा निकाल 70.76% इतका आहे. या विद्यालयात कला शाखेचा57.89%आणि वाणिज्य शाखेचा निकाल 88.88 इतका आहे. कॉलेज मधील कला शाखेत जाधव आदित्य 73.84 % ,कुंदन बोर्ले 70.92%,पाखड मयुर 66 % मिळवुन अनुक्रमे क्रमांक पटकावला आहे तर वाणिज्य शाखेत आग्रे निखिल रमेश 83.38%,खरविलकर श्रुती संजय 82.92%,टिंगरे मयुर 81.84 % गुण घेत अनुक्रमे क्रमांकाने पास झाले आहेत.गुणवान बहुतांशी विध्यार्थी ग्रामीण भागातील आहेत.याच कॉलेज मधील शिपुरकर शंतनु दत्तात्रय 80.61%,सावंत प्रतिक्षा हरीश्चंद्र 76.92 % गुण मिळवुन मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्यात सुयश प्राप्त केले आहे.गुणवान विध्यार्थ्यांचे तालुक्यात सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Post a Comment