कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा चा ९६.८१% निकाल.


तळा (श्री किशोर पितळे) गुरुवारी बारावीच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाइन पध्दतीने निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्या  लयाचा विज्ञान शाखा १००%,वाणिज्य शाखा ९५.२७ व कला शाखेचा ९६.४२ असा एकूण निकाल ९६.८१% लागला. यामध्ये कला शाखेतुन प्रथम क्रमांक राजरत्नेश संतोष गायकवाड(६४.००), द्वितीय क्रमांक प्रतीक्षा काशीनाथ तटकरे(६२.००) व तृतीय क्रमांक ज्ञानेश्वर पांडुरंग शेडगे(६०.३०) यांचा आला.वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक साक्षी सचिन कीर्तने(८३.०७), द्वितीय क्रमांक तेजस्वी किशोर शिर्के(८१.३८) व तृतीय क्रमांक रोहन गजानन मिरगळ(८०.३०) यांचा तर विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक आदर्श मनिष तळेकर(७४.३०),द्वितीय क्रमांक कुमारी सुजान अ. रहीम खानदेशी(७२.७६) व तृतीय क्रमांक साहिलं किरण मेकडे(७०.९२) असा लागला आहे.विद्ययार्थ्यांच्या भावी आयुष्याला कलाटणी देणारा बारावीचा निकाल लागलाआहे.याकडे विद्यार्थी व सर्व पालकांचे लक्ष लागले होते. ग्रामीण  दुर्गम डोंगराळ भाग असलेल्या तळा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी शिक्षणात नेहमीच चांगल्या प्रकारे प्रगती केलेली दिसत आहे तालुक्यात तळे शिक्षण प्रसारक मंडळाचे कला,वानिज्य व विज्ञान शाखेचे कनिष्ठ महाविद्यालय हेएकचआहे याविद्यालयाच्याविद्यार्थ्यांनी १२वी च्या परिक्षेत मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल त्यांचे संस्थेचे पदाधिकारी प्राचार्य शिक्षक व तालुक्यातील सर्व स्थरांतून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा