गटारी नव्हे "दिप अमावस्या" -मिलिंद जाधव..


(बोर्लीपंचतन प्रतिनिधी)
वैज्ञानिक कसोटीबरोबरच पर्यावरणाच्या सिंहासनावर भक्कमपणे मांड ठोकणाऱ्या  आपल्या हिंदू धर्मामधे वर्षभरात सुमारे पंचवीस सणांची रेलचेल असते.याच सण उत्सवातून वैचारिक देवाण-घेवाणीबरोबरच निसर्गातल्या आणि आपलं दैनंदिन जीवन सूकर होण्यासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या प्रत्येक घटकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा महनीय संदेश आपल्या संस्कृतीने जगाला दिला.
      या सणांपैकी सोमवार २० जूलै २०२० रोजी मराठी कालगणनेनुसार आषाढ अमावस्या अर्थात "दिप अमावस्या"म्हणजेच दिव्यांची अमावस्या हा पवित्र सण येत आहे. अंधःकारावर मात करुन आपलं आयुष्य प्रकाशमान करणाऱ्या दिव्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी"दिप अमावस्या" या सणाचा अंतर्भाव आपल्या संस्कृतीत केला गेला.तिन्हीसांजेला देवापूढे दिवा लावून आपल्या निरागस बोबड्या बोलाने शुभंकरोती म्हणणारी मूलं घराघरातलं वातावरण पवित्र करत होती.तो आपल्या वंदनीय संस्कृतीचा एक भाग समजला जातो. मात्र दुर्दैवाने दारू या विषयाशी ऋणानुबंध जोपासणाऱ्या  प्रवृत्तीबरोबरच धर्मशिक्षणापासून स्वतःला जाणीवपूर्वक शतयोजने लांब ठेवणाऱ्या विकृत मानसिकतेच्या लोकांकडून या सणाची "गटारी अमावस्या" या नावाने अवहेलना होऊ लागली.हा दिवस दारू पिऊन गटारात लोळण्यासाठी आहे.अशी विकृत मानसिकता दुर्दैवाने विकसित झाली.वास्तविक कोणताही धर्म दारुसारख्या वाईट व्यसनाचे समर्थन करीत नाहीआणि सण उत्सवासारख्या आनंद शतगुणित करणाऱ्या प्रसंगाला तर कधीच नाही.म्हणून आपण सर्वजण या दिवसाची "गटारी अमावस्या"ही नवनिर्मित विकृत ओळख कायमची मिटवून "दिपअमावस्या" हा प्रचलित शब्द पुन्हा सन्मानाने रूढ करु या. आपण सर्वजण या दिवशी आपल्या संस्कृतीच्या संस्कारानुसार घरातले सर्व प्रकारचे दिवे स्वच्छ करून "नव्या" तेजाने उजळवून त्यांच्यापूढे नतमस्तक होऊन कळत नकळत किंवा जाणीवपूर्वक झालेली चूक सुधारून दिप "अमावस्या"नव्या तेजाने,उत्साहाने साजरी करु या आणि संत ज्ञानेश्वरांच्या "दुरितांचे तिमिर जावो,विश्व स्वधर्मसूर्ये पाहो"या उक्तिनुसार आपल्या धर्मावर, संस्कृतीवर आणि सणउत्सवावर  आलेल्या दुरितांच्या तिमिराबरोबरच समस्त मानव जातीवर आलेलं कोरोनाचं महाभयंकर तिमिर जाऊन अवघ्या विश्वाला मोकळा श्वास घ्यायला लावणारा सूर्य पुन्हा एकदा नव्या तेजाने उजळण्यची आणि आपल्या धर्माची,संस्कृतीची आणि सण उत्सवांची शान वृद्धींगत होण्याची प्रार्थना करुया.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा