तळा(किशोर पितळे)
रायगड जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेले तळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे चक्री वादळात मोठे नुकसान झाले.केंद्रातील सर्व विभागांमध्ये पाण्याची गळती सुरू होती आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची खोली, ऑपरेशन थिएटर, महिला व पुरुष कक्ष, प्रतीक्षा कक्ष, औषध वाटप व नोंदणी कक्ष,अशा विविध विभागांमध्ये पाण्याची गळती होती.मुसळधार पाऊस झाल्यास आरोग्य केंद्रात पाणीच पाणी साचतं असे केंद्राच्या वसाहतीस देखील मोठा फटका बसला असुन येथील निवासी डाॅक्टर परिचारिका आणि कर्मचारी यांना देखील राहण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने ईतर ठिकाणी रहावे जाण्यास लागत असे औषधांच्या खोलीतही गळती होत असल्याने लस आणि औषधे ईतर ठिकाणी हलविण्यात आलेलेआहेत.स्थानिकग्रामस्थ,नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक यांनी या संदर्भात आ.अनिकेत तटकरे यांच्याबरोबर फोनवर चर्चा केली होती.
आमदार अनिकेत तटकरे यांनी ताबडतोब दखल घेत प्रत्यक्षात आरोग्य केंद्राची पाहणी केली व माणगावच्या प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर यांना औषध साठवणूक करण्यासाठी जागा व जनरेटर उपलब्ध करण्याची सूचना केली होती त्याची तात्काळ अंमलबजावणी झाली.त्याचप्रमाणेे नुकसानग्रस्त प्राथमिक आरोग्य केंद्राची लवकरात लवकर दुरुस्ती होण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.रायगड व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना लक्ष घालून प्रस्ताव मंजूर करण्यास सांगितले होते.त्यानंतर तळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे दुरुस्तीचे काम सुरु झाले या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आ.अनिकेत तटकरे यांनी (दि.15)भेट दिली व हे काम उत्कृष्ट दर्जासहीत लवकरात लवकर पुर्ण करावे अशा सुचना त्यांनी दिल्या यावेळी नगराध्यक्षा सौ.रेश्मा मुंढे,पंचायत समिती उपसभापती गणेश वाघमारे,नगरसेवक चंद्रकांत रोडे,तहसीलदार श्री.कनशेट्टी मुख्याधिकारी माधुरी मडके,पंचायत समिती गटविकास अधिकारी व्ही.व्ही.यादव,प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी अमोल बिरवडकर,निलेश कदम,अविनाश शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.तळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दिवसाला शंभरपेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी येतात. त्यांना योग्य उपचार मिळावे यासाठी येथील डॉ. सुबोध बिरवडकर व त्यांचे सहकारी व कर्मचारी त्यांना वेळेत सेवा उपलब्ध करून देतात. मात्र, आरोग्य केंद्राला लागलेल्या गळतीमुळे रुग्ण आणि आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असे.येत्या काही दिवसांत प्राथमिक आरोग्य केंद्राची डागडुजी पूर्ण होणार असुन आ.अनिकेत तटकरे यांनी जातीने लक्ष घालुन तळेवासियांचा प्रश्न मार्गी लावला आहे राजकारणापेक्षा समाजकारणाचा वसा जपून सेवेसी तत्पर राहून सेवा सुविधा उपलब्ध करून दिली त्यामुळे त्यांचे खुप खुप अभिनंदन होत आहेे.
Post a Comment