एस.टी.चा मालवाहतुक ट्रक म्हसळ्यात दाखल

एस.टी.चा मालवाहतुक ट्रक म्हसळ्यात दाखल :श्रीवर्धन- म्हसळाकरानी S.T.माल वाहतुक सेवेचा लाभ घ्यावा : जुनेदी

संजय खांबेटे - म्हसळा
सर्वसामान्यांची S.T प्रथम बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन सेवा देणारी प्रवाशांच्या सेवेसाठी लालपरी S.T.आता मालवाहतुकीची सेवा घेऊन सर्वसामा- न्यांसाठी रस्त्यावर उतरली असून आज नवी मुंबई कळंबोली (FCI) येथून म्हसळा शासकीय गुदामात केंद्र सरकारच्या पंतप्रधान मोफत धान्य योजनेचे १०० क्विंटल तांदूळ घेऊन मालवाहतुक ट्रक हजर झाला.
राज्यांत सर्वसाधारणपणे मे २०२० पासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) वाजवी दर घेऊन माल वाहतुकीच्या क्षेत्रात उतरल्यामुळे मालाची वाहतुक सुरु केली आहे.त्याचाच भाग म्हणून ही मालवाहतुक करणारी रायगड विभागाची गाडी म्हसळ्याला आली असावी असे श्रीवर्धनचे आगार प्रमुख एम.बी.जुनेदी यानी आमचे प्रतिनिधीला सांगितले.माल वाहतुकी च्या क्षेत्रात एसटीने पदार्पण केल्यामुळे आणि एसटीचे दर सर्वसामान्य नागरिकांना परवड- णारे असल्यामुळे माल वाहतूक करणाऱ्यांची पावले एसटीच्या कार्यालयाकडे वळत आहेत. राज्यांतील अनेक खासगी संस्थाना, विविध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना १२ महिने मालाची वाहतूक करावी लागते. यापूर्वी ते खासगी माल वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारां शी संपर्क साधत होते. परंतु आता एसटीने कमी दरात मालवाहतुकीची सेवा उपलब्ध करून दिली आहे.त्याला राज्यांत मोठा प्रतिसाद मिळत आहे.कोकणातील विशेषतः श्रीवर्धन- म्हसळा-दिघी (व्यापारी बंदर)-बोर्लीपंचतन याभागातील व्यापारी शेतकरी वर्गाला या सेवेचा चांगला फायदा होऊ शकेल असेही आगार प्रमुख एम.बी.जुनेदी यानी सांगितले.

"बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी एसटी महा मंडळाचे कुठल्याही आगारांत संपर्क साधावा खासगी वाहतूक दारांनी सांगितलेल्या भाड्याच्या तुलनेत त्यांना एसटीचे वाहतूक दर अतिशय कमी व सेवा उत्तम असल्याचे लक्षात येईल रायगड विभागा करीता सध्यस्थितीत बऱ्यापैकी मालवाहतुक ट्रक उपलब्धआहेत. चौकशी करण्यासाठी दुरध्वनी क्रमांक ०२१४७:-२२२२३३ व ०२१४७:-२२२२४१ यावर संर्पक साधावा."
एम.बी.जुनेदी, आगार प्रमुख श्रीवर्धन


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा