म्हसळा तालुका इयत्ता 10 वी चा निकाल 95.23%,मुलींनी मारली बाजी.
न्यु इंग्लिश स्कूलची मोहनी जाधव 92.40%गुण मिळवुन शाळे मधुन पहिली
संजय खांबेटे : म्हसळा
इयत्ता 10 वी माध्यमिक शलांत परीक्षा सन 2020 चा म्हसळा तालुक्यातील निकाल 95.20% इतका लागला आहे. तालुक्यात 861 विध्यार्थ्यांनी इयत्ता 10 वी ची वार्षीक परीक्षा दिली होती पैकी 820 विध्यार्थी पास होऊन या वर्षी शालांत निकाललाचा दर्जा उंचावला आहे.म्हसळा येथील वसंतराव नाईक कॉलेजचे प्राचार्य मच्छिंद्र जाधव यांची कन्या मोहीनी जाधव हिने 92.40% गुण मिळवुन शाळेत पहिला क्रमांक मिळवला .न्यु इंग्लिश स्कूलचा निकाल 96.47% लागला .शाळेतील 170 पैकी164 विध्यार्थी पास झाले आहेत.याच स्कूलची सायली उजळ हिने 91.40% गुण मिळवुन दुसरा तर सबा सलीम शहा हिने 91%गुण प्राप्त करून तिसरी तर मागास वर्गीयांत पहिला क्रमांक पटकावला आहे.प्रतिक सुर्वे 89.40% गुण मिळवुन शाळेत तीसरा येण्याचा मान मिळविला आहे.स्नेहा बुलबुले 88.20%,मानसी जाधव हिने 85.80 गुण मिळवत मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्यात दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे.तालुक्यातील म्हसळा ए.आय.जे.हायस्कूल 93.79%,आयडीएल इंग्लिश स्कूल 100%,मराठी माध्यमिक विद्यालय वरवठणे 100%,मराठी माध्यमिक विद्यालय कोळवट 87.50%,संदेरी उर्दु हायस्कूल 100%,प्रभाकर पाटील ए. सोसायटी 90%,पाष्टी हायस्कूल 83.33%,मेंदडी हायस्कूल 86.84%,माध्यमिक विद्यालय केलटे 96.15%,एआयजे गोंडघर 94%,न्यु इंग्लिश स्कूल पाभरे 96%,न्यु इंग्लिश स्कूल नेवरूळ 100%,देवघर हायस्कूल 100%,माध्यमिक विद्यालय काळसुरी 98%,न्यु इंग्लिश स्कूल खरसई 87.80%,एस.ए.आझाद हायस्कूल पांगलोली 96.15%,न्यु इंग्लिश स्कूल तळवडे 87.50%, जी.एल.घोसाळकर विद्यालय खामगाव 93.75% निकाल लागला आहे.इयत्ता 10 वी मधील सर्वच गुणवान विध्यार्थी, पालक,शिक्षक आणि संचालक मंडळाचे आमदार अनिकेत तटकरे,जि.प.कृषी सभापती बबन मनवे,जिप सदस्या धनश्री पाटील,सभापती उज्वला सावंत,नगराध्यक्षा जयश्री कापरे,उप सभापती मधुकर गायकर,पंचायत समितीचे सदस्य संदीप चाचले,माजी सभापती छाया म्हात्रे,मा.सभापती महादेव पाटील,मा.सभापती नाझीमभाई हसवारे,तहसीलदार शरद गोसावी, गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे, प्र.गटशिक्षण अधिकारी प्रदीप डोलारे, आदी मान्यवरांनी अभिनंदन करून विध्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Post a Comment