KDA कोकणी डॉक्टर असोसीएशन सेवाभावी व्रत कौतुकाचे ; लोकसेवेसाठी म्हसळा येथे 'फ्लू क्लिनिक' मार्फत मोफत तपासणी
संजय खांबेटे : म्हसळा
कोरोना काळात जर कोणाला सर्दी,खोकला,ताप असे आजार आले तर प्रत्येकाचे मनात कोरोना विषाणू बाबतीत शंका व भिती वाटते . यासाठी योग्य उपचार आणि खबरदारी घ्यावी म्हणुन कोकणी डॉक्टर असोसीएशन,म्हसळा जमाते मुस्लिमीन, आणि संयुक्त समाज म्हसळा यांचे पुढाकाराने पाभरे फाटा येथे लोकसेवेच्या माध्यमातून मोफत 'फ्लु क्लिनिक'सेवा सुरू केली आहे.येथे सर्दी,खोकला,ताप याची विनामूल्य तपासणी करून त्यावर योग्य ती औषध देणे आणि मोफत सल्ला सकाळी 9.30 ते सायंकाळी 4.00 या वेळेत देण्यात येणार असल्याचे समाजसेवक डॉ.मुब्बशीर जमादार व डॉ. नसीम खान यांनी सांगितले.दिनांक 27/07/2020 पासून फ्लु क्लिनिक मध्ये नाव नोंदणीला सुरुवात झाली आसुन बाधितांनी येथे येण्याआधी मोबा क्रं.72491 21095 वर आगाऊ संपर्क साधावा असे कळवि ण्यात आले आहे.म्हसळा येथे आयोजकांनी मोफत फ्लु क्लिनिक तपासणी सेवा सुरू केल्याने नागरिकांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत.शहरांत हा उपक्रम KDA कोकणी चेअरमन डॉ. वसीम पोफळणकर,डॉ.एम.एस राऊत, डॉ. रहीम मेमन, डॉ. नसीम खान, डॉ. इम्रान फकीह, डॉ. मुब्बशीर जमादार यांच्या माध्यमातून सुरू झाल्याचे सांगण्यात आले.
Post a Comment