ग्रामीण भागासह शहराच्या काना कोपऱ्यात पोहोचला कोरोना
( म्हसळा प्रतिनिधी )
म्हसळ्यामध्ये गुरवारी नव्याने २२ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून,यामध्ये दोन तलाठी,एक पोलिस कर्मचारी ,स्टेट बँकेचा कॅशियर व एका शिक्षकाचा समावेश असल्याने तालुक्यात अजून किती फैलावला असेल या भीतीने चर्चा सुरु आहे. आज सापडलेल्या २२ कोरोना बाधित रुग्णांपैकी पाभरे, पेडांबे व वाडांबा या ग्रामिण भागातील प्रत्येकी १ तर उर्वरीत १९ म्हसळा शहरातील आहेत त्यामध्ये ५ रुग्ण कुंभारवाडा परिसर,४ रुग्ण वाऱ्याचा कोंड (गौळवाडी) परिसर,१ रुग्ण कन्याशाळा परिसर ३ रुग्ण शंकर मंदीर परीसरांतील व इतर ६ रुग्ण शहरातील इतर भागातील आहेत. तालुक्यात आजपर्यंत एकूण बाधीत ८१ ,मयत ४, बरे झालेले २९, लागण झालेले ४८ रुग्ण असल्याचे सांगण्यात येते
"म्हसळा शहरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ,हाय रिस्कवाले व स्वॅब घेतलेले रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांचा बाजारात सर्रास मुक्त संचार असल्याचा धक्कादायक प्रकार सतत सामोरे येतो या बाबत तक्रार, सूचना का मार्गदर्शन कोणी कुणाला नक्की करावे या बाबत नागरीक अनभीज्ञ आहेत."
Post a Comment