म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
मागील 3 जून रोजी निसर्ग चक्री वादळाने हरेश्वर, श्रीवर्धन ठिकाणी हॉट स्पॉट असलेल्या ठिकाणापासून संपूर्ण रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्राला झोडपले होते. परंतु या वादळाने रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, हरेश्वर या ठिकाणचे नैसर्गिक, खाजगी मालमत्ता त्याचप्रमाणे झाडे, घरे यांचे अतोनात नुकसान झाले. तसेच आज पर्यत अनेक गावे अंधारात आहेत. विद्युतचे अनेक खांब पडलेले असून त्याचे उभे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असताना या कामाला विलंब होऊ नये म्हणून तसेच मानवता हाच धर्म, आणि मानवसेवा हीच ईश्वर सेवा मानून समाज परिवर्तनाचा वसा घेतलेल्या डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे हजारो श्री सदस्यांचे हात या आपत्तीत तनमन धनाने सेवेसाठी उभे राहिलेत आणि आदरणीय महाराष्ट्रभुषण डॉ.नानासाहेब, डॉ.आप्पासाहेब यांच्या पवित्र शिकवणीचा अंगीकार करत प्रतिष्ठानचे सदस्य पुढे सरसावत डोंगर दरीतुन विद्युत खांब उभे करत आहेत.
दरम्यान श्रीवर्धन तालुक्यासह अन्य तालुक्यात निसर्गचक्री वादळाने संपूर्ण जनजिवन विसकलित केले तर संपूर्णपणे विद्युत खांब जमिनदोस्त केले. 03 जून पासुन आज पर्यंत प्रशासन नियोजन करीत असून व्यापक्ता मोठी असल्याने त्या ठिकाणी प्रशासन देखील हतबल होत आहे. त्या ठिकाणी डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणचे हजारो हात एकत्र येऊन गेल्या आठ दिवसा पासून प्रतिष्ठाणचे अध्यक्ष डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीवर्धन येथील हरिहरेश्वर, दिघी, गाळसुरे, साखरी, निगडी, सायगाव, मारळ, कुरवडे, मारळ बौध्द वाडी, कुरवडे बौध्द वाडी, काळींजे, या ठिकाणी विदयुत खांब उभे करण्यास प्रतिष्ठांचे दोनशे हुन अधिक सदस्य गेल्या आठ दिवसा पासून काम करत आहेत. या वेळी ST विद्युत वाहीणीचे आता पर्यंत 44 खांब LT विद्युत वाहीनीचे 74 खांब बसवून त्यांची विद्युत वायर जोडणी देखील केली आहे. हे काम करण्यासाठी प्रतिष्ठानचे सदस्य सकाळ पासून सायंकाळ पर्यंत पावसाच्या सरीतून काम करीत आहेत. आजवर प्रतिष्ठानणे वेळावेळी प्रशासनास मदत केली आहे. विविध उपक्रम राबवत शासनाचे काम सुलभ केले आहे. प्रतिष्ठानचे कार्य पाहताच सर्वच ग्रामस्थ हातभार लावत प्रतिष्ठानचे हात जोडून आभार मानत आहेत. हे काम सुरू होताच त्या ठिकाणी रायगड जिल्हा परिषदेचे कृषी व पशु संवर्धन समिती सभापती बबन मनवे यांनी देखील भेट घेत प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्यात सहभागी झाले.
Post a Comment