सहा महिन्यांपासून कोरोना योद्धा वैद्यकीय अधिकारी वेतनापासूम वंचित :आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर


(अमोल चांदोरकर) - श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली-पंचतन आरोग्य केंद्रातील भारत मगर या वैद्यकीय अधिकाऱ्याचा गेल्या सहा  महिन्यांपासून वेतन येत नसल्याने त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्याचा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे .

श्रीवर्धन तालुक्यात असणाऱ्या बोर्ली-पंचतन आरोग्य केंद्राला काही महिन्यांपूर्वी रिक्त पंदांचे ग्रहण लागले होते.डॉक्टर नसल्याने आरोग्य सेवेचा तुडवडा जाणवत होता.14 जानेवारी रोजी डॉक्टर भारत मगर हे एक वर्षाच्या कंत्राटी सेवेसाठी बोर्ली-पंचतन आरोग्य केंद्रात रुजू झाले.स्थानिकांना धीर मिळाला.मात्र त्याच आरोग्य अधिकाऱ्यांचा गेल्या पाच महिन्यांपासूनचे वेतन जाणून बुजूण अडवले जात आहे .

याबाबत डॉ. मगर यांनी कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा वेतन काढणाऱ्या अलिबाग येथील कार्यालयात विचारणा केली असता तेथील कार्यालयीन अधिकारी शमा पाटील यांच्या कडून कोणत्याही प्रकारची समाधानकारक उत्तरे मिळत नव्हती तसेच तुमच्या वेतनाचा फंड येतच नाही असे देखील सांगण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकरी यांच्याजवळ देखील याबाबत विचारणा केली असता त्यांच्या कडून देखील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या विषयावर टाळाटाळ करण्याचा प्रकार समोर आला .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा