बोरघर शासकीय वस्तीगृहाचे मागील डोहात बुडूनवीज वितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू.


तळा (किशोर पितळे)
तळा तालुक्यातील बोरघर शासकीय वस्तीगृहाचे मागे असणाऱ्या डोहात वीज कर्मचारी विष्णू कडू पाचपोळे वय वर्षे२८रा.रावेर विभोळ ता.ऐनपूर जि.जळगांंव हा अंघोळीसाठी गेला असता पाय घसरून पाण्यात बुडाला सदरची दुर्घटना १जुलै२०रोजी सकाळी७ते८.३०वा.चे घडली याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यात ३जून रोजी चक्रीवादळात अनेक विद्युत पोल पडुन वीज पुरवठा२०दिवस खंडित झाला असल्याने महावितरणचे काम युद्ध पातळीवर सूरु होते महावीज वितरणने सदर टीम वेगवेगळ्या ठिकाणाहून आली होती त्यांची रहाण्याची सोय शासकीय वस्तीगृहात करण्यात आली होती.बोरघर येथील शासकीय वस्तीगृहाचे मागील डोहात पाय घसरून गुदमरून बुडून मृत्यू झाला.सदर अकस्मात मृत्यू रजिस्टर ७/२०२०सि आर पी सी १७४नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो निरीक्षक गेंगजे याचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि.महाडीक करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा