तळा(किशोर पितळे)
संपूर्ण देशात कोरोना विषाणू संसर्गजन्य रोगाने थैमान घातले असल्याने संपूर्ण प्रशासनाने विविध उपाययोजना योजनाची रोखण्यासाठी अंमलबजावणी केली असताना नागरीकांकडून उत्तम प्रतिसादमिळत होतालाँकडाऊन
शिथील झाल्याने रायगड जिल्ह्यात कोरोनाने डोकं वर काढले असून तळा नगरपंचायत हद्दीतील आनंदवाडी येथिल एका २२ वर्षीय तरूणाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे सदर २२वर्षीय व्यक्तीएप्रिलमध्ये नालासोपाऱ्याहून आलेली असून तीआजारी पडल्याने उपचारासाठी माणगाव येथे नेली असता त्याच्यामधे कोरोना सदृश्य लक्षणे दिसू लागल्याने त्याचे स्वॅब चाचणीसाठी पाठविण्यात आले त्याचा स्वॅब चाचणी रिपोर्ट १ जुलै रोजी सकाळी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. माणगाव-लोणेरे येथे त्याच्यावर उपचार चालू आहेत त्याच्या संपर्कात आलेल्या१० व्यक्तीना क्वारंटाईन करून ठेवण्यात आले असून आनंदवाडी पुर्ण गाव सिल(कंटेन्मेंटझोन) करण्यात आले आहे. यापूर्वी १४कोरोना रूग्ण आढळून आले होते त्यापैकी१२रूग्णांनी यशस्वी मातकरून कोरोना मुक्त झाले तर २ रूग्ण मृत झाले.सद्यस्थितीत नव्याने ३रूग्ण आहेत.महीन्या भरापासून तळा तालुका कोरोना मुक्तीकडे असतानाच बारपे गावातील एक रूग्ण ४५ वर्षीय व्यक्ती दि२४रोजीआढळून आल्यानंतर चार दिवसाच्या फरकाने १७ वर्षाची मुलगी कोरोना पाँझिटीव्ह आढळून आली यानंतर हा रूग्ण आढळून आल्याने तालुक्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.त्यामुळे
प्रशासनाचे टेंशनवाढलेआहे.सदर माहिती तळा तहसील कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे. जिल्ह्यात तळा तालुक्यात त्या मानाने कोरोना रूग्णाचे प्रमाण अगदी नगण्य होते त्यामुळे जवळ जवळ कोरोना मुक्त झाला होता.आता मात्र तालुक्यातील सर्वांच्या चिंतेत वाढ झालीआहे.अजूनही या कोरोना रोखण्यासाठी प्रभावीपणे स्वताःहून प्रयत्न करणे आवश्यकआहे. शहरात येणारे ग्राहक सोशल डिस्टंट पाळत नाहीत
बँकेच्या आवारात सोशल डीस्टंट पाळत नाहीत बाजारात येण्यासाठी रिक्षा मिनीडोअरचा वापर करीत असून अजूनही गांभीर्याने घेत नाहीत.लाँकडाऊन व संचारबंदी शिथिल केल्याने वैयक्तिक स्व संरक्षणाचे नियम शिथील केले आहेत मास्कचा वापर करीत नाही असे निदर्शनास येत आहे स्वतःबरोबर दुसऱ्यांची पण काळजी घ्या जबाबदारीने काळजी घेणे गरजेचे आहे.
प्रशासनाला सहकार्य करा. असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.
Post a Comment