तळा(किशोर पितळे)
संपूर्ण देशात कोरोना सारख्या महामारी विषाणूजन्य संसर्ग रोगाने ग्रामीण भागात देखील हातपाय पसरण्यास सुरु केल्याने भयभीत वातावरण आहे.आपल्या जवळपास तो असल्याने गांभीर्याने घेण्याची गरज असून आवश्यक आहे. प्रशासनाकडून दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन किंवा अंमलबजावणी केली तर साखळी तोडू शकतो.
असे तळा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी माधुरी मडके यांनी प्रतिनिधीशी बोलताना आवाहन केले आहे
त्या पुढे म्हणाल्या की तालुका कोरोना मुक्तीच्या वाटेकडे असतानाच बऱ्याच दिवसाच्या कालावधी नंतर रूग्ण आढळून आल्याने चिंता वाढू लागली आहे.
नगरपंचायत हद्दीत कोरोना रूग्ण आढळून आला असल्याने नगरपंचायत प्रशासनाने दिलेल्या सुचनाची
अनलॉक २.० मधे तळा शहरातील नागरिकांनी खालील सूचना पाळणे बंधनकारक आहे.
१) सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क लावूनच घराबाहेर पडावे अन्यथा ५०० रूपये दंड होईल.
२) ६० वर्षांवरील नागरिकांवर व ज्या नागरिकांना ब्लड प्रेशर, मधुमेह, हृदय विकार ,ओबेसिटीचा त्रास आहे त्यांच्यावर अजूनही लॉकडाऊन आहे. अशा व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी फिरू नये.
३) सामाजिक अंतर पाळण्याची जबाबदारी दुकानदार भाजी विक्रेते व इतर वस्तु विक्रेते ह्यांची आहे. सामाजिक अंतर न पाळणारे विक्रेते रूपये १००० व ग्राहक रूपये २०० एवढया दंडास पात्र आहेत.
४) सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येण्यास बंदी आहे.
५) दुकानदारांनी दुकानात वयस्कर व्यक्तींना गल्ल्यावर ठेवू नये किंवा वस्तु देण्यासाठी सुध्धा ठेऊ नये.
६) नागरिकांनी विनाकारण बाजारपेठेत फिरू नये.
७) विक्रेत्यांनी हात धुण्यासाठी साबण - पाणी / सँनिटायझर ठेवून त्याचा वापर करणे बंधनकारक आहे. ८) सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई आहे. निदर्शनास आल्यास रुपये ५०० दंडास पात्र.
९) सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान, मद्यपान करण्यास मनाई आहे.
१०) उपहारगृहांमधे फक्त पार्सल सेवा उपलब्ध राहील.
११) वैयक्तिक स्वच्छता ठेवा.
१२) रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आजीबाईच्या बटव्यातील उपाय करा. घरातच योगासने , प्राणायाम करा.
१३) आपले आरोग्य आपल्या हातात! आपल्या स्वतःच्या भावी चांगल्या आरोग्यासाठी वरील सूचना पाळून नगरपंचायत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
Post a Comment