म्हसळ्यातील २९ कोरोना + रुग्णानी केली कोरोनावर मात ; नव्याने ८ रुग्णांची वाढ : म्हसळाकर चिंतेत
आरोग्य यंत्रणा ऐरणीवर
संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुक्यात गेल्या तीन दिवसांत कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालल्याने तालुक्यातील जनता भयभीत झाली आहे.तालुक्यात नगरपंचायत हद्दीत 7 रुग्ण तर गोंडघर येथील 1अशा 8 रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती म्हसळा तालुका आरोग्यअधिकारी डॉ.गणेश कांबळे यांनी दिली यामध्ये आरोग्याशी निगडीत तब्बल ६ रुग्ण आहेत, त्यामुळे म्हसळा करांची चिंता वाढत आहे. आतापर्यंत कंटेंनमेंट झोन मधुन आलेल्या चाकरमान्यांपैकी वारळ, खरसई,पाभरे, गायरोणे, दुर्गवाडी ( म्हसळा)कणघर, ठाकरोली तळवडे व कोळे या गावांतून सापडलेले २९पॉझीटीव्ह रुग्ण पूर्णपणे बरे झाले. ही जमेची बाजू आहे.तर तीन मृत आहेत. पॉझिटिव्ह रुग्ण नगरपंचायत हद्दीतील गजबजलेल्या ठिकाणी वास्तव्यास असल्याने त्यांचा अनेकांकडे संपर्क आला आहे.त्यामुळे येथील ग्रामस्थ फारच चिंतेत आहेत. मागिल एक महिना म्हसळा बाजारपेठेत ग्राहकांची प्रचंड वर्दळ वाढली होती , सोशल डीस्टंस, मास्क न लावणे यावर नागरीकांचे स्वतावर व प्रशासनाचे नागरीकांवर निर्बंध नव्हते या बाबत सातत्याने प्रसिध्दी माध्यम शासनाचे लक्ष वेधत असे.
पुन्हा आरोग्य विभाग होत आहे लक्ष्य
" कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाना उपचारासाठी तातडीने अन्यत्र हालविणे गरजेचे असताना अॅम्ब्युलन्स नसल्याने आज सायंकाळपर्यंत रुग्ण आपल्या घरीच आसल्याचे समजते, तालुका आरोग्य व्यवस्था व ग्रामिण रुग्णालयाची यत्रंणा अपुरी पडत आसल्याचे वारंवार तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत आहे."
" तालुक्यांतील बहुतांश खाजगी दवाखान्यात सर्दी, खोकला, ताप व कोरोना व्हायरस वर इलाज केला जात नाही असे बोर्ड लावून सुध्दा सर्दी, खोकला, ताप यावर खाजगी रुग्णालयांतून मोठया प्रमाणावर उपचार करणे सुरू आहे तसाच ट्रेंड रुग्णांचा सुद्धा आहे त्यामुळे शहरांत खाजगी वैद्यकीय दवाखाने सील करण्याची वेळ येत आहे."
Post a Comment