म्हसळ्यामध्ये कोरोनाचा वाढता कहर ; शहरामध्ये नव्याने ८ रुग्णांची नोंद


म्हसळ्यामध्ये कोरोनाचा वाढता कहर: शहरामध्ये नव्याने ८ रुग्णांची नोंद: तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या ४२ वर यापैकी ३ मयत 

म्हसळा -रायगड (निकेश कोकचा)


३ जून रोजी आलेल्या निसर्ग चक्री वादळाला शुक्रवारी एक महिना पूर्ण होत असताना,त्याच काळात प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे म्हसळा तालुक्यात कोरोनाचा भुकंप येणार असल्याचे संगितले जात आहे.शुक्रवार ३ जुलै रोजी म्हसळा शहरासहित तालुक्यातील ८ जणांना कोरोंनाची लागण झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे.

एक महिन्याच्या विश्रांती नंतर कोरोनाने विषाणूनी थेट म्हसळा शहरातील सरकारी व खाजगी दवाखान्यात एंट्री मारली असून शहरात ७ तर तालुक्यातील  गोंडघर येथे १ असे एकूण ८ रुग्ण एकाच दिवसात सापडले आहेत. 

३ जून रोजी रायगडच्या किनारपट्टीवर निसर्ग चक्री वादळलाने धडक दिली होती.या चक्री वादळामध्ये म्हसळा तालुक्याचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून,या नुकसानीत अथवा नागरिकांच्या होणार्‍या धावपळीत शासकीय यंत्रणा व स्थानिक नगरपंचायत कोरोंना नावाच्या रोगाला संपूर्णपणे विसरली असल्याचे चित्र शहरातील रस्त्यावर दिसत होते.मात्र आता कोरोंना विषाणूने शासकीय यंत्रणेच्या चुकीचा फायदा घेत, तालुक्यात आपले हातपाय पसरवण्यास सुरवात केली आहे.

चक्री वादळाच्या थेट एक महिन्यांनातर म्हसळा तालुक्यात कोरोंना रुग्णाचा भूकंप आला असून,शहरातील सरकारी दवाखान्यातील पॉझिटिव्ह आलेल्या कर्मचार्‍याची बायको व मुलाला, खाजगी रुग्णालय असलेल्या राऊत हॉस्पिटल मध्ये असणार्‍या दोन कर्मचार्‍यांना,शहरातील कन्याशाळा परिसरात एकाच कुटुंबातील दोन जणांना, शहरातील इतर एक महिलेला व गोंडघर येथील एक आरोग्य सेवेतील कर्मचार्‍याला असे एकूण ८ जणांना कोरोंनाची लागण झाल्याचे शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

म्हसळा तालुक्यात कोरोंना रुग्णांचा आकडा आता ४२ वर पोहचला असून त्यातील ३ जणांचा मृत्यू तर २९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा