म्हसळा तहसील कार्यालय सील केलेले दिसत आहे
(म्हसळा प्रतिनिधी)
म्हसळा शहरा सहित तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.तहसील कार्यालय,स्टेट बँक व नगरपंचायतमधील कर्मचार्याला कोरोंनाची लागण झाल्यामुळेही तीनही कार्यालये सील केली आहेत. आज मंगळवारी म्हसळा शहरासहित तालुक्यात कोरोनाचे १७ रुग्ण आढळले आहे.एका दिवसात सापडणार्या कोरोना रुग्णांचा हा आकडा आतापर्यंतचा सर्वाधिक असून तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील एक मृत व्यक्तीच्या कुटुंबातील चार जणांना,
गोंडघर येथील आरोग्य सेवेत कार्यरत असणार्या मृत व्यक्तीच्या कुटुंबातील चार जणांना,गौळवाडी परिसरातील एका तरुणाला ,शहरातील सोनार आळी येथील एका वृद्ध महिलेला ,शहरातील एक बेकरी मालकाला ,शहरातील एक भाजी विक्रेत्याला ,शहरातील एक हार विक्रेत्याला ,तहसील कार्यालयातील एका कर्मचार्याला,नगरपंचायत मधील एका कर्मचार्याला,म्हसळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका आधिकाऱ्याला कर्मचार्याचा पत्नीला व स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका अधिकाऱ्याला कोरोंनाची लागण झाल्याचे प्राप्त अहवालातून स्पष्ट झाले.
तालुक्यात आता कोरोना रुग्णाचा आकडा ५९ झाला असून त्यातील ४ मयत, २९ बरे झालेले, तर २६ जण बाधित आहेत.
Post a Comment