म्हसळ्यातील लॉक डाऊन कालावधी वाढवा : युवा सेना म्हसळा


करोना (corona virus) हा संक्रमणातून पसरतो : म्हसळ्यातील लॉक डाऊन कालावधी वाढवा : युवा सेना म्हसळा

संजय खांबेटे म्हसळा
म्हसळा शहर व तालुक्यात जुलै महीन्या पासून कोरोना + रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने दि.२ जुलै ते ५ जुलै या कालावधी साठी पुकारलेला जनता कर्फ्यू हा तब्बल ७ दिवसासाठी असावा अशी मागणी म्हसळा युवा सेनेतर्फे प्रशासनाकडे करण्यात आली. यावेळी युवासेना म्हसळा तालुका अधिकारी अमित महामुणकर,शहर अधिकारी सुजित बोरकर,उप शहर अधिकारी कौस्तुभ करडे,युवा पदाधिकारी राहून जैन यानी म्हसळा पोलीस ठाणे, नगरपंचायत प्रशासन, व्यापारी संघटना याना प्रत्यक्ष निवेदन देऊन मागणी केली. या कालावधीत मेडिकल व दवाखाने वगळता सर्व व्यवहार बंद आसावे अशी मागणी आहे.कोरोना पॉझीटीव्ह रुग्णाचा बाहेरील जगाशी कमी संपर्क येईल आणि त्याच्या मार्फत पसरणारी करोनाची साखळी तोडण्यात येईल हा यातील मुख्य हेतू आसल्याचे महामुनकर यानी सांगितले तालुक्यातील वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी व म्हसळा तालुक्याला कोरोना मुक्त करण्यासाठी म्हसळा शहरामध्ये किमान ७ दिवस बाजारपेठ बंद ठेवावी अशी मागणी युवा सेनेने लावून धरली.

"करोनाचे संक्रमण(कहर)जास्त होऊ नये याकरिता शासनाने बाधितांना आयसोलेशन ( Isolation Ward ) मध्ये ठेवणे म्हणजेच विलगीकरण करणे व तात्काळ उपचारासाठी दाखल करणे महत्वाचे असते ,म्हसळ्यातील रुग्णानाआरोग्य विभागाने Isolation Ward मध्ये ठेवले नाही अथवा तब्बल २४ तास उलटूनही अॅम्ब्युलन्स मिळत नाही या सबबीवर नजीकच्या कोव्हीड रुग्णालयांत सुद्धा दाखल केले नाही "अमित महामुणकर,तालुका अधिकारी युवा सेना म्हसळा

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा