प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
म्हसळा ४ जुलै २०२० रोजी म्हसळा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पांगळोली आदीवासी वाडी आणि तोराडी आदीवासी वाडी येथे एकुण ६० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले या जीवनावश्यक वस्तू मध्ये (तांदूळ १० किलो , गहू पिठ १० किलो, गोडेतेल २ किलो, तूरडाळ ४ किलो, साखर २ किलो, साबण १०, मिठ १ कि, चहा पावडर ५०० ग्रॅम, मिरची पावडर ५०० गॅम, हळद २५० ग्रॅम,धनापावडर ५००ग्रॅम, मास्क १०,पॅड १ बाॅक्स, ईतर लहान मुलांचे खेळाच साहित्य) जवळ जवळ एका कुटुंबाला ३५ ते ४० किलोचे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
म्हसळा तालुक्यातील सावित्री नदीच्या काठावर वसलेले आदीवासी मागास समाजातील कुटुंबा वरील साहित्य आपल्या देशातील नावाजलेली मानाकिंत युवा संस्था या संस्थेच्या माध्यमातून वापट करण्यात आले.
३ जून २०२० रोजी निसर्ग चक्रिवादळात या पांगळोली आणि तोराडी आदीवासी वाडी वरील कुटुंबांचे खुप प्रमाणात नुकसान झाले, त्याचबरोबर सध्या कोरोना आजारामुळे लोकांना या हाणामारीत कुटुंब सावरताना डोईजड झाले आहे.
अशा परिस्थितीत युवा संस्थेने केलेले फार मोठे मोलाचे सहकार्य केले . युवा संस्था समन्वयक श्री.राजु वंजारे,श्री सचिन नाचनेकर सिध्दांत म्हात्रे,अजय बोरकर,रोहन चव्हाण, नितेश धावरे ईत्यादी संस्थेचे समन्वयक व प्रतिनिधी उपस्थित होते स्थानिक पातळीवर प्राथमिक शिक्षक श्री जयसिंग बेटकर सर यांनी विशेष योगदान दिले आणि शैलेश दिवेकर, नितेश शिर्के,अजित काप,स्वप्निल काप यांनी सहकार्य केले.
Post a Comment