कोरोनाचा विसरून खतरा म्हसळा शहरात भरली खरेदीसाठी जत्रा : स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष


म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

रायगड जिल्ह्यात १५ जुलै ते २४ जुलै या काळात शासनाने पुकारलेल्या लॉकडाऊन पुकारल्याने मंगळवारी सामान खरेदीसाठी आणि बँकेच्या कामकाजासाठी म्हसळा तालुक्यातील नागरिकांनी मोठी गर्दी करून जणु काही गाव जत्राच भरली असल्याचे स्वरूप शहरातील बाजारपेठेला प्राप्त झाले होते. म्हसळा तालुक्यासह शहरात कोरोनाच्या रुग्णाने शंभरीचा आकडा गाठला असताना कोरोनाचा खतरा विसरून लोक जणु काही जत्रेलाच आलेले आहेत असे वास्तव बाजरपेठेत निदर्शनास आले. लॉकडाऊन करण्यापेक्षा शासनाने तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेत बदल आणणे जरुरीचे असल्याचे सर्व सामान्यांच्या प्रतिक्रिया आहेत. लॉकडाऊन हे सामान्य व मध्यम व्यापाऱ्याना आणि गरजवंत ग्राहकाना वेठीस धरल्या प्रमाणे होत आहे. म्हसळा तालुक्यात लॉकडाऊन च्या झटक्याने आज जिवनावश्यक अशा भाजीपाला व किराणा वस्तू घेण्यासाठी बाजारपेठेत, बॅंकांतून ग्राहकानी प्रचंड गर्दी केली होती. शहरात आज आठवडा बाजार किंवा यात्रेचे स्वरूप आले होते. तालुक्यात मार्च अखेर पासून जुलै पर्यंत कमी अधिक वेळ किमान दीड ते दोन महीने पेक्षा जास्त कालावधी लॉकडाऊन मध्ये गेला तर जून महिना निर्सग चक्रीवादळाचे तडाख्याने आर्थिक फटक्यात गेला. त्यामुळे अर्थिक संकटात असलेली सर्वसामान्य माणूस लॉकडाऊनच्या झटक्यांत अडकत आहे. कोरोना बाधित रुग्णांचे बाबतीत जून अखेरीस ३२ त्यापैकी २९ पूर्ण बरे, ३ मृत व एकही नवीन रुग्ण नव्हता. त्याच म्हसळा तालुक्यातील आजची एकूण बाधीतांची संख्या १०१, नवीन रुग्ण ०५, उपचार घेत असलेले ४७, बरे झालेले ४८, मृत ६ आहेत. जून अखेर नंतर कोरोनाचा फैलाव करण्याचे मूळ कारण ठरले कोरोंटाईन रुग्णांबाबत ढिसाळपणा, आरोग्य यंत्रणेसह शासकीय यंत्रणेत योग्य तो समन्वय नसणे, गांभीर्य नसणे याच कारणाने तालुक्यातीत रुग्ण संखेत बऱ्या पैकी वाढ झाली परंतु या सर्वांवर लॉकडाऊन हा उपाय नसल्याच्या प्रतिक्रिया पुढे येत आहेत.
म्हसळा शहरांत मागील ४ महीन्यात सतत काहीना काही निमीत्त करून नगरपंचायत प्रशासनाने लॉकडाऊनचा घोळ करण्यापेक्षा स्थानीक लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यानी याच काळात घरोघरी जाऊन थर्मल स्क्रिनिंग, ऑक्सिजन लेव्हल चेक करणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी औषधे देणे, सर्वाधिक धोका असणार्‍या व्यक्तींचा शोध घेणे या उपाययोजना राबविण्यासाठी आरोग्य विभागाची मदत घेणे जरुरी होते. दुसऱ्या बाजूने जिल्हा व तालुका प्रशासनाने कोणतीही पावले उचलली नाहीत. तालुक्यात कोविड केअर सेंटर (सीसीसी) तात्काळ सुरू होणे, कोविड रुग्णांसाठी आयसोलेशन कॅम्प करणे यासारख्या मूलभूत सुविधा सुरू करणे आवश्यक आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा