अलिबाग
रायगड जिल्ह्यातील विविध खेळांच्या क्रीडा संघटना क्रीडाशिक्षक तसेच महाविद्यालयातील क्रीडा विभाग प्रमुख सर्वांना सुचित करण्यात येते की, राज्य शासनाकडून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. यासाठी सदर खेळाडूने ऑलिम्पिक क्रीडा प्रकारात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर कनिष्ठ अथवा वरिष्ठ गटांमध्ये सहभाग तसेच प्रावीण्य प्राप्त कामगिरी केलेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सदर खेळाडू हा दारिद्र्य रेषेखालील असावा ही अट रद्द करण्यात येत आहे, त्यामुळे रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू ज्यांनी ऑलिंपिक क्रीडा प्रकारांमध्ये 1 जानेवारी 2016 नंतर प्राविण्य प्राप्त केले आहे, असे खेळाडू आर्थिक मदत मिळण्यास पात्र असतील. शासकीय निमशासकीय तसेच विविध प्राधिकरण व खाजगी नोकरी मध्ये असलेले खेळाडू यासाठी पात्र असणार नाहीत. अधिक माहितीसाठी श्री सचिन निकम क्रीडा अधिकारी यांच्याशी 88 56 09 36 08 या क्रमांकावर दिनांक 15 जुलै 2020 रोजी पर्यंत तात्काळ संपर्क साधावा.
Post a Comment