( म्हसळा प्रतिनिधी )
रायगड जिल्ह्यात १५ जुलै ते २४ जुलै या काळात पुकारलेल्या लॉकडाऊन पेक्षा शासनाने तालुक्यातील आरोग्यव्यवस्थेत बदलआणणे जरुरीचे आसल्याचे सर्व सामान्यां .ळच्या प्रतिक्रिया आहेत. लॉक डाऊन हे सामान्य व मध्यम व्यापाऱ्याना व गरजवंत ग्राहकाना वेठीस धरल्या प्रमाणे होणार आहे.
म्हसळा तालुक्यात लॉक डाऊन च्या झटक्याने आज जिवनावश्यक अशा भाजीपाला व किराणा वस्तू घेण्यासाठी बाजारपेठेत, बॅंकांतून ग्राहकानी प्रचंड गर्दी केली होती. शहरात आज आठवडा बाजार किंवा यात्रेचे स्वरूप आले होते. तालुक्यात मार्च अखेर पासून जुलै पर्यंत कमी अधिक वेळ किमान दीड ते दोन महीने पेक्षा जास्त कालावधी लॉक डाऊन मध्ये गेला.तर जून महिना निर्सग चक्रीवादळाचे आर्थिक फटक्यात गेला. त्यामुळे अर्थिक संकटात असलेले म्हसळाकर लॉक डाऊनच्या झटक्यांत अडकत आहे.
कोरोना रुग्णांचे बाबतीत जूनअखेरीस ३२ त्यापैकी २९ पूर्ण बरे,३ मृत व एकही नवीन रुग्ण नव्हता त्याच म्हसळा तालुक्यातील आजची एकूण बाधीतांची संख्या ९६ नवीन रुग्ण १५, उपचार घेत असलेले ५८, बरे झालेले ३६ , मृत ६ आहेत. जून अखेर नंतर कोरोनाचा फैलाव करण्याचे मूळ कारण ठरले कोरोंटाईन रुग्णांबाबत ढिसाळपणा, आरोग्य यंत्रणेसह शासकीय यंत्रणेत योग्य तो समन्वय ,गांभीर्य नसणे याच कारणाने तालुक्यातीत रुग्णसंखेत बऱ्या पैकी वाढ झाली. परंतु या सर्वांवर लॉक डाऊन हा उपाय नसल्याच्या प्रतिक्रिया पुढे येत आहेत.
म्हसळा शहरांत मागील ४ महीन्यात सतत काहीना काही निमीत्त करून नगरपंचायत प्रशासनाने लॉक डाऊनचा घोळ करण्यापेक्षा स्थानीक पदाधिकाऱ्यानी याच काळात घरोघरी जाऊन थर्मल स्क्रिनिंग, ऑक्सिजन लेव्हल चेक करणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी औषधे देणे, सर्वाधिक धोका असणार्या व्यक्तींचा शोध घेणे या उपाययोजना राबविण्यासाठी आरोग्य विभागाची मदत घेणे जरुरी होते. दुसऱ्या बाजूने जिल्हा व तालुका प्रशासनाने कोणतीही पावले उचलली नाहीत. तालुक्यात कोविड केअर सेंटर (सीसीसी) तात्काळ सुरू होणे, कोविड रुग्णांसाठी आयसोलेशन कॅम्प करणे यासारख्या मूलभूत सुविधा सुरू करणे आवश्यक होते.
" ४ महीन्याच्या कालावधीनंतर अपयश लपविण्यासाठी जिल्ह्यांत पुकारलेला लॉक डाऊन हा सर्वसामान्याना तसेच हळूहळू सुधारत असलेल्या ग्रामिण आर्थिक घडीला अडचणीत आणण्याचा प्रकार आहे,लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या स्थितीमध्ये आर्थिकदृष्ट्या सबळ वर्गातील काही प्रमाणात तग धरू शकतात. मात्र, ज्यांचे पोट हातावर आहे असे मजूर, गरीब वर्गातील लोक, छोटे व्यवसायीक, शेतकरी यांच्यासाठी हा अतिशय कठीण काळ आहे. या वर्गातील लोकांना सध्या अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागत आहे."
महादेव पाटील , तालुका प्रमुख, शिवसेना म्हसळा.
"कोरोना सोबत घेऊन नियमांचे पालन करत सर्वसामान्य जनता जगण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांच्यावर लॉगडाऊनचे प्रेशर व अन्य मोठ्या कंपन्याना पळवाट हे शासनाचे धोरण चुकीचे आहे."
संतोष पाटील, चिटणीस, म्हसळा ता.शे.का.पक्ष.
" शासनाने WHOच्या लॉक डाऊन बाबतच्या धोरणाचा कोणताही आभ्यास न करता घेतलेला निर्णय हा सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्यासारखा आहे. शासनाने जनजागृतीवर लक्ष देणे व आरोग्य सुविधा दर्जेदार .द्याव्या"
डॉ. मुईज शेख, अध्यक्ष , म्हसळा तालुका राष्ट्रीय कॉंग्रेस.
Post a Comment