पत्रकार संजय रिकामे यांच्या पाठपुराव्याने ३८ दिवसांनी भानंगकोंड झाले प्रकाशमय


तळा (किशोर पितळे) रायगड मध्ये३जुन रोजी चक्रीवादळ झाले मोठ्या प्रमाणावर घराची पडझड व वीजचे खांब कोसळणे,वायरी तुटल्या होत्या.वीज पुरवठा खंडित झाला होता संपूर्ण तालुका अंधारात होता हळू हळू प्रकाशमय होत जात गेला.परंतु भानंगकोंड व परिसर प्रकाशमय होण्यासाठी पत्रकार संजय रिकामे यांनी सतत च्या पाठपुराव्याने आज ३७दिवसांंनी प्रकाशाने उजळून निघाले आहे.या भागातील वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी अधिक कालावधी लागला असता अत्यंत अडचणीचा सामना महावितरणला करावा लागत होता.सामाजिक कार्याचेबांधीलकीतून पुढाकार घेऊन ग्रामस्थांच्या माध्यमातून महावितरणला मदत करून या भागातील वीजपुरवठा पुर्ववत करण्यात यश मिळाले.अजूनही अनेक गावांमध्ये वीज पुर्ववत झालेली नाही.सोसाट्याचा वारा पाऊस याची तमा न बाळगता खासगी ठेकेदार विद्युत विभागाचे अधिकारी कर्मचारी वायरमन भानंगकोंड ग्रामस्थ यांनी कार्यतत्परता दाखवुन भानंगकोंड गावचा विद्युत पुरवठा पुर्ववत सुरळीत केला.निसर्ग चक्री वादळाच्या तडाख्यात भानंगकोंड या गावाला विद्युत पुरवठा करणारे लोखंडी पोल(खांब) आणि डीपी मोडुन पडल्याने तब्बल ३८ दिवस  हे गांव अंधारात चाचपडत जीवन जगत होते या अडतिस दिवसाच्या  कालावधीत परिसरात पावसाची संततधार होती सोसाट्याचा वारा पाऊस याची तमा न बाळगता खासगी ठेकेदार विद्युत विभागाचे अधिकारी आणि भानंगकोंड ग्रामस्थ यांनी कार्यतत्परता दाखवुन गावचा विद्युत पुरवठा पुर्ववत सुरळित केला त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व आनंदी वातावरण झालेआहे. भानंगकोंड गावाला भानंग येथील जंगलातून विद्युत पुरवठा करणारी  वाहीनी जाते गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या निसर्ग चक्रिवादळाच्या तडाख्यात  गावातील सात पोल आणि डिपी मोडुन पडल्याने तीन जुन पासुन गावचा विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. त्यानंतर सतत घोंगावणारा वारा पाऊस ही विद्युत वाहीनी जोडण्यास अडचण करत होता  विशेष म्हणजे जंगल भागातून जाणारी ही विद्युत वाहीका आणि डिपी बदलून ती मुख्य रस्त्याच्या बाजुला टाकण्यात आली.त्यामुळे भविष्यात इतका मोठा त्रास ग्रामस्थांना होउ शकणार नाही खासगी ठेकेदार विद्युत पुरवठा अधिकारी वायरमन आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने विद्युत पुरवठा सुरळीत केला गेला आहे. दरम्यान गावातील विद्युत पुरवठा तब्बल दीड महीना बंद असल्याने गावातील सर्वच छोटे उद्योग बंद पडले आहेत.परिणामी गावातील दैनंदिन चक्रच कोलमडले ऐन पावसाळ्यातील शेतीच्या कामाची धांदल व पिण्याच्या पाण्यापासून ते दळण यासाठी द्यावा लागणारा वेळ याची सांगड घालताना शेतकरी व महिला वर्गाची  चांगलीच धावपळ उडाली.पत्रकार संजय रिकामे,संतोष तांबडे,दिलीप पाटील यांनी महावितरण अधिकारी ठेकेदार यांच्याकडे सातत्याने संपर्क साधुन नवीन डीपीसाठी विशेष प्रयत्न केले आणि भानंगकोंड येथील वीजपुरवठा पुर्ववत करुन घेतला गावातील सर्व नवतरुण मंडळ यांनी त्यांचे आभार मानुन अभिनंदन देखील केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा