( संजय खांबेटे, म्हसळा )
स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत म्हसळ्यातील रुग्णांनी मोठया प्रमाणावर करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज तब्बल १५ नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत म्हसळ्यात करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या ५८ झाली आहे. कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकार शक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या ३२ आहे.
तालुक्यात आतापर्यंत काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत असे ६ रुग्ण मयत झाले आहेत. तर तालुक्यातील एकूण बाधीतांची संख्या ९६ झाली असून शंभरीकडे वाटचाल सुरु आहे. कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण वाढीचे प्रमाण सुरवातीला ग्रामिण भागात होते परंतु आता ते प्रमाण शहरांत वाढले आहे. म्हसळा शहरांतील बहुतांश शासकीय कार्यालये कोरोनामुळे सील आहेत. त्यामध्ये ग्रामीण रुग्णालय तहसील कार्यालय, नगर पंचायत व स्टेट बँक, पंचायत समीती आदी कार्यालयांतील कर्मचारी कोरोना + आले आहेत, म्हसळयात काही पॉझीटीव्ह रुग्णांवर होम कॉरंटाईन करून इलाज केला जात आहे.
"म्हसळा तालुक्याची आरोग्य यंत्रणाच आजारी आहे ती तात्काळ सुधारावी, म्हसळ्या मध्ये तब्बल १० लक्ष रुपये संपवून आयटीआय मध्ये केलेले कोविड केअर सेंटर (सीसीसी) तात्काळ सुरू होणे, पुरेसा औषध साठा उपलब्ध व्हावा, कोविंड रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्ण वाहीका,वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग तात्काळ पुरविण्यात यावा, नव्याने या वर्गातील वैद्यकीय आधिकाऱ्यांची बदल्या करण्यात येऊ नयेतअशी मागणी नागरीकांकडून होत आहे."
Post a Comment