तळा(किशोर पितळे)तळा तालुक्यातील महागांव येथील५७वर्षीय व्यक्तीला कोरोना बाधित झाला आहे. सदर व्यक्ती वरसगावकोलाड प्राथमिक आरोग्य केंद्रात कंपाऊंडर कर्मचारी आहेत.त्यांच्या संपर्कात आई व पत्नी या २जणांना क्वाँरंटाईन केले आहे त्यांचे स्वँब टेस्ट घेण्यात आली आहे.सदर रूग्ण लोणरे कोविंड सेंटर येथे उपचार घेतआहे.तालुक्याची कोरोना रुग्ण एकूण संख्या २२झाली आहे.कासव गतीने संख्या वाढत असली तरी नजीकच्या काळात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.आज पर्यंत रायगड मधील पनवेल व उरण तालुुका वगळता इतर तेेेरा तालूके आँरेज व ग्रीन झोन मध्ये होते त्यामुळे प्रशासनाने जिल्ह्यात लाँकडाऊन शिथिल केली होती व जनतेने थोडा सुस्कारा सोडला आणि कोरोना संपुष्टात आला आहे असे समजून प्रशासनाच्या सुचनांकडे दुर्लक्ष करू लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात देखील कोरोनारोगाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे.याला रोखण्यासाठी स्वतःप्रयत्न केले तरच लवकर कोरोना मुक्त होऊशकतो.यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे.शहरात दैनंदिनकामासाठी येत असताना सोशल डिस्टटींगचा फज्जा उडताना निदर्शनास येत आहे.बँकेच्या व्यवहारासाठी येणारे जनता अतिशय दाटीनेवाटीने लाईन मध्ये ऊभे रहात असुन यामध्ये देखील कोरोना बाधित असू शकतो तरी अजूनही जनता गांभीर्याने घेत नाही.सद्यस्थितीत २१रूग्णापैकी १५ कोरोनावर मात करून ठणठणीत बरे झाले असून २मृत्यू झाले तर५रूग्ण उपचार घेत असून तालुक्याची एकूण संख्या२२ झाली आहे.अशी माहिती तळा तहसील कार्यालयातून प्राप्त झाली आसून प्रशासनाने दिलेल्या सुचनाचे पालन करा. सुरक्षित रहा.आपल्या बरोबर इतरांची काळजी घ्या आवश्यक काम असेल तरच बाहेर पडा. प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
तळा तालुक्यातील महागांव येथे सापडला १ कोरोना पाँझेटीव्ह रूग्ण : एकूण संख्या २२
Hemant Bhau Payer
0
Post a Comment