तळा(किशोर पितळे)
रायगड जिल्ह्यात पालकमंत्री आदिती तटकरे यांनी १५ ते २६ तारखेपर्यंत जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तळा बाजारपेठ पूर्णतः बंद ठेवण्यात आली. रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा झपाट्याने वाढत चाललेला प्रादुर्भाव लक्षात घेता दि.१३ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद घेऊन कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्या १५ जुलै च्या मध्यरात्री पासून २६ जुलै पर्यंत लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे सांगितले.लॉकडाऊन काळात भाजीपाला व किराणा दुकानदारांना पार्सल सेवा देण्यास मुभा देण्यात आली असून त्यासाठी लागणारे पास तहसीलदारांकडून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्यामुळे बाजारपेठेतील भाजीपाला व किराणा व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन फक्त पार्सल तसेच घरपोच सेवासुरूकेलीआहे.तळापोलिसांकडून शहरातील बळीचा नाका येथे बंदोबस्त ठेवण्यात आला असून विनाकारण बाजारात फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे.१० दिवस पूर्णपणे बाजारपेठ बंदराहणार असल्यानेतालुक्यातील नागरिकांनी लॉकडाऊनच्या दोन दिवस आधी मोठी गर्दी केली होती.मात्र गुरुवारी लॉकडाऊनच्या सुरुवातीस नागरिकांनी घरीच राहणे पसंत केल्याने तळा बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळाले.या लाँकडाऊन मध्ये लहान मोठी किराणा दुकान, चहा टपरी,भाजी दुकाने, रिक्षा, मिनीडोअर, वडापाव स्टाँल पुर्णतः बंद ठेवल्याने बाजारपेठेत शुकशुकाट दिसत आहे. कोरोना मुक्त तालुका करण्यासाठी व प्रादुर्भाव रोखण्यासाठी सज्ज झाला आहे असेच म्हणावे लागेल
Post a Comment