म्हसळा तालुक्यात भात लावणी अंतीम टप्प्यात : तालुक्यात १३०३ मि.मि. पावसाची नोंद.


( म्हसळा प्रतिनिधी )
तालुक्यात भात लावणीची कामे अंतिम टप्प्यात झाली आहे. तालुक्यातील अनेक गावातून भात लावणी ९५ % पूर्ण झालेली आहे. डोंगराळ भागातील उखारू भात पीक लागवड थोडया प्रमाणात राहीली आहे. गतवर्षी पेक्षा यावर्षी सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे निर्धारित वेळेआधीच लावणी झाल्याचे तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब गावडे यानी सांगितले. तालुक्यात २४०० हेक्टर क्षेत्रांत भाताची ,नाचणी ४०० हेक्टर क्षेत्रातं ,वरी सुमारे १०० हेक्टर क्षेत्रांत लागवड झाल्याचे गावडे यानी सांगितले.मागील तीन ते चार दिवसापासून पावसाची संततधार सुरू असून अंतिम टप्प्यात आलेल्या भात लावणीला वेग आला आहे त्यामुळे वेळेपूर्वीच लावणी आटपल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. बहुतांश शेतकऱ्यानी रुपाली, जोरदार,रुचिका,अस्मिता, ज्योतिका, वैष्णवी, साईराम, साई, श्रीराम या सुधारीत, सुर्वणा लोकल वाण, लोकनाथ ५०५ संकरीत जातीची लागवड केली आहे.
"सध्या पाऊस चांगला झाल्यामुळे अनेक ठिकाणी भात लावणी संपली आहे , भातखाचारावरील बांध व परिसर शेतकऱ्यानानी तणमुक्त करावे, अधिक उत्पादनासाठी भात पिकास आवश्‍यक ती सर्व अन्नद्रव्ये मिळाली पाहिजेत.अधिक उत्पादनक्षम भात पीका साठी योग्य प्रमाणात संतुलितपणे खताचा वापर करावा. त्यासाठी माती परीक्षण करणे आवश्यक आहे. मुख्य अन्नद्रव्यात नत्र, स्फुरद व पालाश यांचा समावेश आसावा"
भाऊसाहेब गावडे,ता.कृ.अ. म्हसळा
फोटो

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा