पावसाळ्यात बाहेर पडणाऱ्या बेडकांसारखी अवस्था कोंकणी माणसाची झाली आहे का..?


डराव डराव

शब्दांकन : कृष्णा म्हसकर 
जीवघेण्या कडक उन्हाळ्यानंतर मृगाचा धो धो पाऊस सुरू झाला की  की एका रात्रीत रातकीड्यांची कीरकीर ऐकू येते. व  त्याच बरोबर रात्रभर  ऐकू येते ती पिवळ्या धम्मक बेडकांची डराव डराव. सुरवातीचे काही दिवस संपले की त्यांचेही डराव डराव ऐकू येत नाही. 
आपल्या कोकणच्या  माणसांचे अगदि तसेच झाले आहे . असे वाटते. कुठलाही विषय आला की तात्पुरते उच्यरवात तावातावाने विषय मांडायचा. आणि मग वेळ झाली की मोबाईल  ठेवून शांत झोपायचे. 

आता गणपती आला. जिल्हाधिका-यानी गणपतीचे पत्रक काढताच आम्ही जागे झालो.  साहजिकच आहे. गणपती हा आमच्या परंपरागत संस्कृतीचा प्रश्न आहे. 
घराघरांत गणरायाचे धुमधडाक्यात स्वागत करणारे आम्ही गणेशभक्त. पण ह्यावर्षी  कोरोणाचे संकट. 

आज कोकणी माणसाचे *पाणी सरकारने जोखलेले आहे. हे कोकणी काहीच करू शकणार नाहीत. ह्याची पुर्ण खात्री आताच्या  व  पुर्वीच्या  सरकारना पण होती. 

आता एक गोष्ट सांगा. आतापर्यंत कोकणी माणूस  कोकणच्या न्याय मागण्या  घेवून कधीतरी मोर्चा,धरणा, उपोषण कींव्वा तिव्र आंदोलनाच्या माध्यमातून आक्रमक झाला आहे काय ?
कोकणात अनेक गावात धरणे झाली. आपल्या गावातही झाले.लोक विस्थापित झाली. देशोधडीला लागली.  मुठभर लोक सोडली तर कोण गेले का त्यांच्या मदतीला. नाही. आम्ही स्वस्थ.
   
दुसरी गोष्ट स्वातंत्र्यापासून आतापर्यंत कोकणच्या जल,शिक्षण,वैधकीय,शेती,विद्युत इत्यादी विवीध योजनांचा  कोकणसाठी ठेवलेला राखीव निधी पच्छिम महाराष्ट्रात  पळवला गेला. पच्छिम महाराष्ट्र  सुजलाम व धनवान झाला. माझा कोकण पुन्हा उपेक्षित राहीला. केले का आमच्या नेत्यांनी व जनतेने आंदोलन. नाही . आम्ही  स्वस्थ.

रहदारीचा प्रश्न घ्या.  कोकणचा प्रवास डोंगरद-यातून  एसटी मधून होत होता . रेल्वे यावी म्हणून केले का आंदोलन . नाही. आम्ही  स्वस्थ. मा. मधु दंडवते व जाॅर्ज  फर्नानडीस यांच्या प्रयत्नांमुळे  रेल्वे झाली. आमचा  वडीलोपार्जित  जमीन  जुमला रेल्वेच्या रूळाखाली गेला. आम्ही  बेघर झालो. पण  ना भुमी पुत्रांना नोकरी ना पुरेसा मोबदला. तरी आम्ही स्वस्थ. 
आज कोकणच्या  उरावरून धडधडत रेल्वे दक्षिणेत जाते. पण  काही गाड्या वगळता महत्त्वाच्या गाड्यांना कोकणात कणकवली , कुडाळ, सारख्या महत्वाच्या ठीकाणाना स्टाॅप ही नाही. केले  का आम्ही आंदोलन. नाही. सर्वस्व गमावले तरीही आम्ही  स्वस्थ.

 स्वातंत्र्याला 70 वर्षे होतील . तरीही कोकणात   अद्ययावत मेडीकल काॅलेज, सुसज्य हाॅस्पीटल,  सैनिक शाळा, संगित  विद्यालय,  आधुनिक कृषी काॅलेज, उच्च्य शैक्षणिक  संस्था  किव्वा कुठलीही मोठी संस्था अपवाद वगळता आपल्या कोकणात नाही. ही वस्तुस्थिती  आहे.  पण आम्ही  केलय का कधी आंदोलन. काढलाय का कधी मोर्चा.  केलीय का कधी मागणी.  रडल्याशिवाय आई पण दुध देत नाही. हे राजकारणी  तर गेंडयाच्या कातडीचे. हे काय सहज देणार तुम्हांला.  त्यासाठी नियोजनात्मक दूरदृष्टीने चळवळ  उभारावी लागते. व त्यासाठी लागते खंबिर व प्रामाणिक नेतृत्व. ते ही  आपल्याकडे  मोठ्या  प्रमाणात आहे. मुंबई महापालीकेतील  70% नगरसेवक कोकणातील असतील. इथे ते आपल्या विभागात  पाणि, रस्ता , संडास बांधतील.सोयी करतील. पण स्वत:च्या गावात  पाणी नाही. रस्ता नाही. त्यासाठी काही प्रयत्न  करणार नाहीत. तसेच आमचे  इतर पुढारी. काही कोकणचे नेते काम करतायत. पण त्यांचे  पाय आपलेच इतर जातभाई ओढतात. पश्र्चिम महाराष्ट्रात विवीध लाॅबी आपल्या विभागात सरकारी निधी ओढण्यासाठी व सुधारणा  करण्यासाठी प्रयत्न  करतात. तर आमचे नेते आपलेच पाय ओढतात. म्हणूनच कोणीतरी कोकणला खेकड्याची उपमा देतात.  खरच आहे ते. स्वता पुढे जात नाही. आणि कोण गेला तर *पाय ओढायला एकत्र येतात. 
आता मुख्य विषय गणपतीचा. 
कोरोणावेळी उत्तर  भारतीयासाठी  80 कोटी रूपये मोफत रेल्वे प्रवासासाठी दिले.व गावी पाठविले. आणि आम्ही  इ- पासची वाट बघत बसलो.  
आता या सणासाठी तरी रेल्वे व्यवस्था करावी व इतर मागण्यासाठी म्हणून  कोकणी माणसाने एकत्र  येवून जोरदार मोहीम उघडावी लागेल. तरच निभाव लागेल.  एकत्रीत  या,संघटीत  व्हा व संघर्ष  करा. तरच यश मिळेल.  अन्यथा ये रे माझ्या मागल्या. 
वाचा ,विचार करा,आपले मत मांडा. चळवळ  ऊभी करूया. 
कोणाला दुखावण्याचा हेतू नाही. 🙏🏻
कृष्णा म्हसकर 
9892722254

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा