श्रीवर्धनमधील राजेश पुसाळकर यांच्या उध्वस्त घरासाठी बोर्लीपंचतन येथील अन्सार चोगले यांचा मदतीचा हात


मकरंद जाधव-बोर्लीपंचतन 
  ३ जून रोजी रायगड जिल्ह्यात थैमान घातलेल्या निसर्ग चक्री वादळात अनेकांचे संसार उध्वस्त झाले.त्यात श्रीवर्धन दांडा येथील राजेश चंद्रकांत पुसाळकर यांचे राहते घर वादळामध्ये पुर्णपणे उध्वस्त झाले त्यामुळे या कुटुंबावर मोठे संकट कोसळले.प्रशासनाने पंचनामा केला पण राहते घर उध्वस्त झाल्याने व पावसाचे दिवस असल्याने ते लवकरात लवकर उभे राहण्यासाठी धडपड चालु होती.त्यासाठी शासनाची मदत वेळेत मिळणे गरजेचे होते हालाखीची परीस्थिती असलेल्या पुसाळकर कुटुंबाची झालेली बिकट अवस्था बोर्लीपंचतन येथील माजी जिल्हा परीषद सदस्य व शिवसेना उपजिल्हाप्रमुख शामकांत भोकरे यांना समजताच त्यांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांना मदतीसाठी आवाहन केले या आवाहनाला प्रतिसाद देत बोर्लीपंचतन येथील सामाजिक कार्यकर्ते अन्सार चोगले यांनी पुसाळकर कुटुंबाचे दुःख समजून घेत त्यांना तात्काळ रोख बारा हजार रु.रकमेची मदत केली आहे.त्यामुळे अन्सार चोगले यांच्या रुपाने संकटकाळात खरेखुरे सामाजिक कार्य समोर आले आहे.
  त्याचबरोबर पुसाळकर कुटुंबाला शासकिय मदत लवकारत लवकर मिळण्यासाठी शामकांत भोकरे यांनी मुरुड अलीबाग मतदारसंघाचे शिवसेना आमदार मा.महेंद्र दळवी यांनासुध्दा या घटनेची माहीती देताच पुसाळकर कुटुंबाबरोबरच इतर उध्वस्त कुटुंबीयांची घरेसुध्दा लवकारात लवकर उभी रहावी यासाठी त्यांना शासकीय मदत त्वरीत मिळावी म्हणुन आमदार महेंद्र दळवी हेसुध्दा जातीने प्रयत्न करीत आहेत.या संटकाळात आमच्या पाठीशी उभे राहुन आम्हाला मदत करणाऱ्यांचे राजेश पुसाळकर यांनी मनापासुन आभार मानले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा