म्हसळ्यात इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर ३२ रुग्णानी केली कोव्हीड वर मात

( संजय खांबेटे,म्हसळा)
स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत म्हसळ्यातील ३२ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज एका नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत म्हसळ्यात करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या -44 झाली आहे. कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या ३२ आहे.
 तालुक्यात आतापर्यंत काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत असे ५ रुग्ण मयत झाले आहेत. तर तालुक्यातील एकूण बाधीतांची संख्या ८१ आसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी गणेश कांबळे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा