तळा (किशोर पितळे)
चक्रीवादळानंतर महावितरणाच्या महागोंधळाचा सामना तळा तालुक्यातील हजारो विज ग्राहकांना करावा लागत आहे.नैसर्गिक आपत्तीत विजेचे खांब कोसळले विद्युत तारा तुटल्या वादळात महावितरणाचे करोडो रुपयांचे नुकसान झाले.शासन पातळीवर विजेचे साहीत्य,काम करण्यासठेकेदार,महावितरणाच्यामदतीसाठीअतिरिक्त अधिकारी वर्ग कर्मचारी ईतर जिल्हातुनआले. ग्रामस्थांनी स्वखर्चाने विद्युत पोल आपल्या गावी नेले खड्डे खणले,पोल उभे केले,विद्युत तार ओढल्या सर्व प्रकारचे सहकार्य केले.परंतु अजुनही महावितरणाचे महागोंंधळलेले अधिकारी आणि ठेकेदार दीड महीना होऊन गेला तरी विद्युत पुरवठा सुरळीत करु शकलेले नाहीत.वीजे अभावी पाणी पुरवठा खंडित झाला आहे
तसेच अवलंबून असणारे उद्योग घंदे,पिठ गिरणी, ईस्त्री
व्यवसाय बंद पडले असुन जीवन कसे जगायचे असा प्रश्न पडला आहे.सातत्याने वीजेचा फाँल्ट सापडत नाही अशी उतरे येत आहेत त्यामुळे अधिकारी वर्गावरील सर्व सामान्य नागरिकांचा विश्वास उडाला आहे.अनेेेक वेळा संधी देऊन विद्युुुत पुरवठा सुुरळीत करण्यास अपयश येेणाऱ्या अधिकाऱ्यांंना का पाठिशी घातले जात आहे?असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडलेला असताना सत्ताधारी आता अधिकाऱ्यांच्या बाबतीत कोणता निर्णय घेतात याकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहेे. चोवीस तास कामाची बांधिलकी, शिवाय जीवघेण्या विजेशी दिवसरात्र खेळताना कधी जीव गमवावा लागेल याचा भरोसा नाही. ग्राहकांची,जनतेची मर्जी राखत,त्यांचा मानसन्मान ठेवत वायरमन काम करत आहेत. तालुक्यात एका वायरमनने आपले प्राण देखील गमावलेले आहेत.परंतु विजेच्या समस्या दुर करण्यासाठी अधिकारी कमी पडत आहेत.नियोजन शुन्य कारभाराचा फटका सर्व सामान्य् नागरिकांना बसत आहे.दिड महीना होऊन सुद्धा लाईटचा खेळ खंडोबा सुरुच आहे.विजेचा प्रश्न कधी मार्गी लागणार याचा जाब विचारण्यासाठी ग्रामस्थांचे लोंढेच्या लोंढे मोठ्या संख्येने महावितरण कार्यालयात येत आहेत त्यांना उत्तर देण्याऐवजी कार्यालयातुन अधिकारी पळ काढत आहेत.बोरघर येथील सब स्टेशन येथेअधिकारी वर्ग हजेरी लावत असल्याचे समजताच तेथेही ग्रामस्थांचे लोंढे येत आहेत.ग्रामस्थांना खोटी आश्वासने देऊन अधिकारी तेथुनही पळ काढत आहेत.हे अजुन कीती दिवस चालणार.?. अनेेेक आढावा बैठका घेेेण्यात आल्या मात्र त्याचा कुठलाही परिणाम झालेला दिसत नाही.महावितरणाच्या महागोंधळाला जवाबदार कोण? सत्ताधारी की अधिकारी असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला असूून असंंतोष व्यक्त करीत आहेत .
"विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी अनेक आढावा बैठका घेण्यात आल्या परंतु त्याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम महावितरण अधिकारी वर्गावर झालेला दिसत नाही केवळ आश्वासने मिळत असुन तळा तालुका अजुनही अंधारात आहे.राज्याचे उर्जा मंत्री रायगडची वीजे बाबत कशी काय परिस्थिती आहे किती नुकसान झाले आहे.पहाणीसाठी फिरकलेच नाहीत.याबाबत मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांनी यात लक्ष घालुन तालुक्याचा विजेची समस्या मार्गी लावावा अशी माफक अपेक्षा आहे."
-कैलास पायगुडे भाजपा तालुका अध्यक्ष
Post a Comment