दोन महिन्याने अंधारातून प्रकाशित लेप ग्रामस्थ झाले उल्हासित:विजवितरण योध्यांना दिले धन्यवाद.

म्हसळा -वार्ताहर
3 जुनच्या निसर्ग चक्रीवादळा नंतर लेप पंचक्रोशीतील ग्रामस्थ तब्बल दोन महिने विजविना अंधारात होते.डोंगर दऱ्यातून विजजोडणी असलेली म्हसळा तालुक्यातील अनेक गावे अद्यापही विजेची चातका प्रमाणे वाट पाहात आहेत.लेप गाववाडीत खंडीत झालेला विजप्रवाह पुर्ववत करण्यासाठी खासदार सुनिल तटकरे,पालकमंत्री ना. अदितीताई तटकरे,आमदार अनिकेत तटकरे यांचा सातत्याने पाठपुरावा आणि विशेष प्रयत्नाने कणघर लेप सडकमार्गे विजमहामंडळाच्या मुख्यअभियंता श्रीमती पुष्पा चव्हाण,कार्य.अभियंता सवाईराम,विभागीय अभियंता खांडेकर,अभियंता वानखेडे,अभियंता कदम यांच्या मार्गदर्शनाने लाईनफोरमन श्री साळवी,श्री बिरवाडकर सहकारी कर्मचारी आणि ठेकेदार मुलतानी आणि कंपनी,स्थानिक पदाधिकारी आणि विशेषत: युवा शक्तीने तीन दिवस श्रमदान करून अथक मेहनतीने दि.18 जुलै रोजी लेप पंचक्रोशीतील विजप्रवाह पुर्ववत सुरु केला आणि सायंकाळी 8.15 वाजता गाव प्रकाशमय झाला.सातत्यपूर्ण दोन महिने बंद असलेली गावे रात्रीच्या अंधारातुन प्रकाशमय झाली आणि सर्वच ग्रामस्थ उल्हासित झाली.सर्वांच्याच चेहऱ्यावर आंनद ओसंडून वाहत होता.या कामी ग्राम.पंचायत लेप आणि कणघर नेतेमंडळींचे सहकार्य व योगदान मोलाचे होते. विज वितरण व्यवस्था करण्यासाठी आपत्कालीन परीस्थितीत मदतीचा हात देणाऱ्या सर्वच विजयोद्यांचे माजी जि.प.सदस्या वैशाली सावंत,समाजसेवक व्यंकटेश सावंत यांनी सर्वांचे आभार मानुन धन्यवाद दिले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा