निर्सग चक्रीवादळ : म्हसळा तालुक्यातील नुकसानग्रस्तांना शाासनाकडून झाले ३७ कोटी २९ लाख १३ हजार २४९ रुपये निधीचे वाटप


(म्हसळा प्रतिनिधी)
३ जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची, झाडांची, विजेच्या खांबांची पडझड झाली होती. गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले होते. नुकसान ग्रस्त नागरिक या संकटातून सावरले नाही तर कोरोनामुळे आर्थिक मंदी असतानाच शासनाने नुकसानग्रस्तांना नविन निकषाप्रमाणे अनुदान देऊन मदत केली आहे.

यासाठी जिल्ह्यांत नुकसानग्रस्तांना शासनाकडून नुकसान भरपाई म्हणून २९३ कोटी ४६ लाख ८७ हजार २४३ रुपये इतका निधी प्राप्त झाला. त्यापैकी आतापर्यंत २१३ कोटी ५४ लाख हजार ६२ रुपये निधीचे वाटप पूर्ण झाले. म्हसळा तालुक्यात ३७ कोटी २९ लाख १३हजार २४९ रुपये निधीचे वाटप झाले.
  •  गोठे, झोपड्यांसाठी वितरीत केलेला एकूण निधी - रु.२६ कोटी २ लाख ४हजार ९९९, तर खर्च केलेला एकूण निधी रु २१ कोटी १७लाख ९९ हजार ५५९ , 
  •  व्यक्ती, जखमी व्यक्ती, कपडे, भांडीसाठी अर्थसहाय्यअर्थसहाय्य वितरीत केलेला एकूण निधी - रु. १ कोटी ७४ लाख, तर खर्च केलेला एकूण निधी रु. १ कोटी ५४ लाख आहे.
  • शेती नुकसानीसाठीचे अर्थसहाय्य . म्हसळा- तालुक्यासाठी वितरीत केलेला एकूण निधी - रु.९ कोटी ३१ .लाख ८०हजार, तर खर्च केलेला एकूण निधी रु.१ कोटी ७६ लाख ७रहजार ५००, 
  • मृत जनावरांना अर्थसहाय्यरु. १२ लाख ५८ हजार, 
  • तालुक्यातील दुकान, टपरीसाठी अर्थ सहाय्य रु.९ लाख ७८हजार २५० वितरीत करण्यात आले. 
  • तालुक्यातील कोळी समाजातीत मासेमारी साधन सामुग्रीचे ( उदा. बोट, जाळी व अन्य सामान) नुकसान भरपाई अद्याप प्राप्त झाली नसल्याचे सांगण्यात आले.
"निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या रायगड जिल्ह्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ भेट दिली व बदललेल्या निकषाप्रमाणे सर्वांना नुकसानभरपाई दिली जाईल, हे मा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते, त्याच वेळी महाविकास आघाडीच्या पालक मंत्री अदीतीताई तटकरे व रायगडचे खासदार सुनील तटकरे यानी केंद्राकडे केलेल्या विशेष पाठपुराव्यामुळेच संपूर्ण रायगडसह कोकणाला योग्य प्रमाणात नुकसान भरपाई मिळाली."
महादेव पाटील ,तालुका प्रमुख , म्हसळा तालुका शिवसेना

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा