जिल्हाधिकार्यांकडून सुधारीत अधिसूचना जारी
सकाळी 6 ते सकाळी 11 वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी
टीम म्हसळा लाईव्ह । रायगड
रायगडात लॉकडाऊन कालावधीत जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात दूध विक्री दुकाने, किराणा सामान, फळे व भाजीपाला, चिकन, मटण, अंडी, मासे ही दुकाने, आस्थापना सकाळी 6 ते सकाळी 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबतची सुधारीत अधिसूचना आज (18 जुलै) जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रात 15 जुलै रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते 26 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला. तसे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले. संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करताना किराणा सामान, फळे व भाजीपाला, चिकन, मटण, अंडी, मासे यांची काऊंटर विक्रीला परवानगी देण्यात आली नव्हती. त्याऐवजी केवळ घरपोच सेवा सकाळी 8 ते रात्री 10 वाजेदरम्यान पुरविण्यास परवानगी देण्यात आली होती. तसेच दूध विक्री व दुधाचे घरपोच वितरण करण्यास सकाळी 8 ते रात्री 10 वाजेदरम्यान परवानगी देण्यात आली होती.
काऊंटर विक्री बंद असल्याने, नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. काही दुकानदार, विक्रेते यांच्याकडून दुकाने सुरु करण्याची मागणी जोर धरत होती. अखेर याची दखल घेत, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आज सुधारित अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात दूध विक्री दुकाने, किराणा सामान, फळे व भाजीपाला, चिकन, मटण, अंडी, मासे ही दुकाने, आस्थापना सकाळी 6 ते सकाळी 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
बातम्या जाहिरातींसाठी संपर्क -
Mail Id - mhaslalive@gmail.com
Whatsapp - +918828462894
आपल्या तालुक्यातील बातम्या वाचण्यासाठी नियमित लॉगइन करा www.mhaslalive.com
तसेच वेबसाईटवरील 🔔 बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा... जेणेकरून म्हसळा लाईव्ह च्या प्रत्येक नवीन बातम्यांचे अपडेट आपल्याला नोटिफिकेशन च्या माध्यमातून सर्वात आधी आपल्याला मिळतील.
⚡ ताज्या घडामोडी तुमच्या whatsapp वर मिळवण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आजच Registere करा...
https://forms.gle/nfhx6dJGk4AKT9gG9
म्हसळा लाईव्ह च्या व्हाट्स अप बुलेटिन साठी आपला मोबाईल नंबर रजिस्टर केल्यांनतर.....
आपल्या फोन मध्ये हा no +91 88284 62894 म्हसळा लाईव्ह या नावाने सेव्ह करा आणि मिळवा ताज्या बातम्या आपली व्हाट्सप वर...
-टीम म्हसळा लाईव्ह..
Post a Comment