म्हसळा :अरुण जंगम
म्हषळा तालुक्यातील अदिवासी समाजाला कोरोवा लाँकडाउनचा प्रचंड आर्थिक फटका बसला आहे.ऐन हंगामामध्ये कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमिवर देशात केल्या गेलेल्या लाँकडाउनमुळे हातात मुबलक प्रमाणात आंबा व काजुची पिके असुनही योग्य दर न मिऴाले नाही.परिणामी या अदिवासींना आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत या उन्हाळी हंगामामध्ये अपेक्षेप्रमाणे आंबा व काजुची पिके आली परंतु कोरोनामुळे संचारबंदी असल्याने बाजारपेठ बंद झाली पर्यायाने या अदिवासींना घरोघरी जावुन विक्री करावी लागली.अदिवासी समाजास बारमाही उत्पन्नाचा कोणताही स्रोत नाही,उन्हळी हंगामामध्ये येणा-या आंबा व काजु न पावसाऴी हंगामामध्ये रानभाज्या विकुन आपला उदरनिर्वाह चालवितात.
पावसाळ्यात डोंगराळ भागात उगवणार्या रानभाज्या या आदिवासी समाजाच्या उदरनिर्वाहचे साधन बनल्या आहेत. पावसाच्या दिवसांत रानभाज्यांच्या विक्रीतून मिळणार्या पैशांतून त्यांची रोजीरोटी चालते. मात्र जिल्हा लॉकडाऊनमुळे हे उत्पन्नाचे साधनच हरविल्याने, आदिवासी समाजाच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला असून, उपासमारीची वेळ आली आहे.
पावसाळ्यात आदिवासी समाजाला मोलमजुरीसाठी कामे फार कमी प्रमाणात असतात. त्यामुळे आपला उदरनिर्वाह करण्यासाठी आदिवासी समाज या हंगामात डोंगराळ भागात उगवणार्या टाकळा, टेरी, कुडा, अळू, अळंबी, कुलू, कंटोळी, कुरडू, भारंग, दिंडा अशा कितीतरी प्रकारच्या रानभाज्या घेऊन बाजारात विक्रीसाठी आणतात. खवय्यांनाही या रानभाज्यांची मेजवानी मिळते. रुचकर, औषधी गुणांमुळे नागरिकांमधून या रानभाज्यांना मोठी मागणी असते. त्यामुळे त्यांच्या विक्रीतून आदिवासी महिलांना दोन पैसे मिळतात. त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह चालतो. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे 15 जुलै ते 26 जुलैपर्यंत लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे हे उदरनिर्वाहाचे साधनही हिरावले गेले आहे.
बाजारपेठ बंद असल्याने या गोरगरीब आदिवासी समाजासमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे आहे. रानभाज्या आणून बाजारात विकून आपला उदरनिर्वाह करणार्या आदिवासी समाजावर उपासमारीची वेळ आली आहे.
"ह्या हंगामामध्ये मुबलक प्रमाणात आंबा व काजुची पिके आली परंतु संचारबंदी असल्याने 200रुपये शेकडाने विक्री होणारे ओले काजुगर 60 ते 70 रुपये शेकडा दराने विकावे लागले पर्यायाने पावसाळ्यामध्ये लागणा-या सामान जसे मसाले,तेल या सारख्या जिवनावश्यक वस्तु घेता आल्या नाहीत."
प्रकाश पवार, म्हसळा अदिवासीवाडी अध्यक्ष
" बागांची निगा राखुन त्यामधुन मिळणा-या उत्पन्नावर आमचे घर चालते मात्र संचारबंदीमुळे अपेक्षीत दर आंबा व काजुला मिळाला नाही पर्यायाने आमच्या समाजातील नागरिकांवर उपासमार आली आहे.
यशवंत पवार, सरपंच, म्हसळा अदिवासीवाडी
"लाँडाउन मध्ये सरकारकडुन आंम्हास मोफत तांदुळ व गहु मिळतात मात्र त्या सोबत ईतरही जिवनावश्यक वस्तु लागतात ह्या वस्तु लाँकडाउनमुळे महाग झाल्याने आंम्ही मुबलक प्रमाणात घेववु शकत नाही, पावसाळी हंगामात रानभाज्या विकुन दोन पैसे मिळण्याची आशा होती मात्र जिल्हा लाँकडाउनमुळे ह्या उत्पन्नाला देखील आंम्हस मुकावे लागते."
जानकी किसन माडवकर, रानभाज्या बाजार पेठेमध्ये विकणारी महीला
◆ "निसर्ग" चक्रीवादळाने उत्पन्न देणारी आंब्याची तसेच काजुची झाडे उन्मळुन पडलीअसुन पुढील दोन ते तिन वर्ष मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट य़ेणार आहे.
◆ पुन्हा नव्याने लागवड केल्यास साधारणत: सदर कलम उत्पादन क्षमतेचे होण्यास दोन ते तीन वर्ष लागतात त्यामुळे पुढील काही वर्ष उत्पादन न मिळाल्यास या समाजावर मोठे आर्थिक संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
◆ आंबा व काजुचे उत्पादन न मिळाल्यास पर्यायाने मोळी (जळावु सुकी लाकडे) विकुन आपला उदरनिर्वाह चालवावा लागेल यात तिळ मात्र काही शंका येत नाही.
Post a Comment