( म्हसळा प्रातिनिधी )
कोरोना बाधीतांची आजची आकडेवारी पहाता म्हसळाकरांसाठी सुखावह म्हणजे केवळ एक कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आहे तर उपचार होणाऱ्यांचे प्रमाण सुद्धा ५०%आहे.आजपर्यंत कोरोना बाधीत १२२ रुग्ण आहेत,उपचार घेत असलेले ५५ , मृत ७ तर पूर्णपणे बरे झालेले ६० जण आहेत.आजची ही स्थिती मागील काही दिवसांपेक्षा फार सुधारीत आहे.
तहसीलदार कार्यालय,नगर पंचायत कार्यालय ,म्हसळा पोलिस ठाणे,ग्रामीण रुग्णालय,प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसळा, स्टेट बँक ऑफ इंडिया,बँक ऑफ इंडिया म्हसळा, आण्णासाहेब सावंत सह बँक ( महाड बँक ) डॉ.राऊत क्लिनिक अशा मोठया जनसंर्पक असलेल्या शासकीय संस्थामध्ये कोरोनाचे विषाणूने हल्ला केल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनांत साशंकता निर्माण होत आहे.राज्यातील बॅंकांमध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि नियमित सॅनिटायजेशन सारख्या उपाय योजना केल्या जात नाही गर्दी नियंत्रित करण्यासाठी बॅंका प्रवेशद्वारावर व अन्य सुरक्षा रक्षक तैनात करत नाहीत अशा अनेक तक्रारी सतत होऊनही वरीष्ठ कार्यालयाने दखल घेतली नसल्याने,तसेच नगरपंचायत व अन्य शासकीय कार्यालयांतून निकृष्ट अगर दर्जाहीन सॅनिटायजर वापरल्याने रुग्ण संखेत वाढ झाली असे जाणकारांचे म्हणणे आहे. अशा अनेक कारणानी म्हसळा तालुक्यात तुलनेने ग्रामिण भागापेक्षा शहरातील शासकीय,निमशासकीय कार्यालय,बँका आणि रुग्णांलयात covid-19 चे बाधीत रुग्ण जास्त आढळुन आले आहेत.
" विविध बॅंक व शासकीय कार्यालयांत फार मोठया प्रमाणांत जनता गर्दी करते , या गर्दीवर प्रशासनाने समन्वय साधून अगर बँक व्यवस्थापनाने गार्ड नेमणे आवश्यक आहे.बहुतांश कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची आसन व्यवस्थेत सुरक्षीत अंतर नाही, शासनाने फार मोठया प्रमाणात मार्गदर्शक सूचना सतत लागू केलेल्या असतानाही त्याचे पालन योग्य तऱ्हेने होत नाही हे म्हसळा करांचे दुर्देव आहे."
महादेव पाटील, तालुका प्रमुख शिवसेना म्हसळा.
Post a Comment