अनुराधा पौडवाल यांच्यातर्फे शाळेला आर्थिक मदत


म्हसळा । वार्ताहर 
 न्यू इंग्लिश स्कूल नेवरूळ विद्यालयाला जित्मल चांदमल दमानी ट्रस्टच्या माध्यामातून ५० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात आले . पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते हा धनादेश स्कूल कमिटीला देण्यात आला . कृष्णाजी महाडिक यांच्या प्रयत्नातून मिळविलेल्या या मदतीचा स्वीकार करण्यात आला . प्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बबन मनवे , महेश घोले , अक्षय महागावकर , संजय लटके , सल्लागार समिती अध्यक्ष रवींद्र लाड , ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष राजेंद्र लटके , पोलीस पाटील निलेश लटके , सुनील दिवेकर , तुषार रिकामे , पांडुरंग खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते . निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्याला झोडपले . विशेषतः श्रीवर्धन , म्हसळा भागात त्याचा जोर जास्त असल्याने गावेच्या गावे उद्ध्वस्त करुन सोडली . अनेक घरं , सार्वजनिक सुविधा वादळात कोलमडल्या , त्याचबरोबर शाळासुद्धा भुईसपाट झाल्या . त्यामुळे गावकऱ्यांपुढे मुलांच्या पुढील शिक्षणाची आणि शाळा पुन्हा नव्याने उभी करण्याच्या समस्या होत्या . ही समस्या समाजसेवक कृष्णाजी महाडिक यांच्या प्रयत्नातून जित्मल चांदमल दमानी ट्रस्ट , यांच्या विद्यमाने शाळेस ५०,००० रु.चा आर्थिक मदत जाहीर करुन त्वरित धनादेशाही देण्यात आला . त्याचप्रमाणे पद्मश्री गायिका अनुराधा पौडवाल यांनीही ग्रामीण भागातील मुलांच्या संगणकीय विकासासाठी , शहरी मुलांप्रमाणे गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या मुलांनाही शिक्षण मिळावे यासाठी शाळेला संगणक किंवा इतर शालेय साहित्यासाठी मदत देण्याचे तसेच आणि गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करण्यासाठी आवश्यक मदत करण्याचे आश्वासन या कार्यक्रमाप्रसंगी दिले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा