चिपळूण : ओंकार रेळेकर
कोरोनाबाबत कोणीही सोशल मीडिया अथवा अन्य ठिकाणी अफवा पसरवल्यास अशांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी दिला आहे. ते म्हणाले, प्रत्येक गावांमध्ये कोरोनाविषयी जनजागृती होत आहे. ग्रामकृती दल कार्यरत आहे. गावात येणाऱ्या व जाणारांवर बारीक लक्ष ठेवून आहे. प्रशासन तसेच आरोग्य यंत्रणादेखील सतर्क आहे. एखाद्या व्यक्तीचा तपासणीसाठी गेलेला रिपोर्ट पॉजिटिव्ह आल्यास आरोग्य यंत्रणा आवश्यक ती पुढील कार्यवाही करते. त्या व्यक्तीला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येते, तसेच त्या व्यक्तीच्या घरातील सदस्यांचेही स्वाब घेऊन त्यांना क्वारंटाईन केले जाते. असे असतानाही कोरनाविषयी काही गावांमध्ये अफवा पसरवल्या जात आहेत, परिणामी गावात भीती पसरत आहे. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही श्री. ढवळे यांनी केले आहे.
बातम्या जाहिरातींसाठी संपर्क -
Mail Id - mhaslalive@gmail.com
Whatsapp - +918828462894
आपल्या तालुक्यातील बातम्या वाचण्यासाठी नियमित लॉगइन करा www.mhaslalive.com
तसेच वेबसाईटवरील 🔔 बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा... जेणेकरून म्हसळा लाईव्ह च्या प्रत्येक नवीन बातम्यांचे अपडेट आपल्याला नोटिफिकेशन च्या माध्यमातून सर्वात आधी आपल्याला मिळतील.
⚡ ताज्या घडामोडी तुमच्या whatsapp वर मिळवण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आजच Registere करा...
म्हसळा लाईव्ह च्या व्हाट्स अप बुलेटिन साठी आपला मोबाईल नंबर रजिस्टर केल्यांनतर.....
आपल्या फोन मध्ये हा  no +91 88284 62894 म्हसळा लाईव्ह या नावाने सेव्ह करा आणि मिळवा ताज्या बातम्या आपली व्हाट्सप वर...
-टीम म्हसळा लाईव्ह..
 
 
 
  
Post a Comment