लॉकडाऊनच्या घोषणेला म्हसळा करांची १०० % साथ
बीगेन अगेन, पुनश्च: हरीओमपेक्षा" गो "कोरोनासाठी म्हसळाकर एकवटले
संजय खांबेटे : म्हसळा
जिल्हाधिकारी रायगड व पालकमंत्री अदिती तत्करे यांच्या आदेशानुसार दि.15 मध्यरात्री पासून म्हसळाकरानी कडकडीत बंद पाळले असून काही वेळा साठी बीगेन अगेन, पुनश्च: हरीओमपेक्षा आम्हाला कोराना मुक्त म्हसळा घडवायचा आहे असे आज म्हसळ्याचे चित्र होते. सकाळच्या वेळांत काही दूध विक्रेत्यांची दुकाने उघडी होती परंतु सकाळी ९ नंतर सामान्य नागरिक,लहान मोठे व्यापारी, रिक्षा चालक मालक संघटना,कापड, किराणा, स्टेशनरी, कटलरी, फेरीवाले ,अशा सर्व घटकांनी लॉक डाऊन मध्ये १००% सहभाग घेतला होता. तहसीलदार तथा इन्सिडंट कमांडर यानी शहरांतील २४ किराणा व्यापारी ,१० चिकन व मटण विक्रेते व दुग्ध व्यवसायीकाना घरपोच माल देण्याबाबत समन्वय साधला असून ग्रामिण पातळीवर गटविकास अधिकारी व शहर पातळीवर मुख्याधिकारी नगरपंचायत याना योग्य ते परवाने देण्याबाबत सूचित केले आहे.
Post a Comment