रायगड | टीम म्हसळा लाईव्ह
कोविडच्या संकटामुळे अर्धमेली अर्थव्यवस्था झालेली असतानाच कोकणात चक्रीवादळ आले. कोकणी माणसाना उध्दवस्त करणारा वादळ काही तासानंतर शांत झाले. मात्र त्यानंतर उघड्यावर आलेले संसार पुन्हा उभा करण्याचे आवाहन आहे. झाडामाडांचे झालेले नुकसान कोकणासाठी अधिक आणि दिर्घकाळ परिमाण करणारे आहे. आर्थिक कणाचे माडून पडले आहे. यावर मलम ठरावे अशी ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’ राज्य सरकारने कोकणासाठी खास केली आहे. खरे तर बागायतदार,शेतकर्यांसाठी सर्वणसंधी आहे. या योजनेचा लाभ कोणीही सोडून नये. काय आहे योजना आपण समजून घेवू.!
◆ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्ग फळबाग लागवड कार्यक्रमासाठी लाभार्थीचे नाव असलेले मग्रारोहयो योजनेचे जॉब कार्ड, शेतीचा 7/12, 8-अ, आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स प्रत आदी कागदपत्रांची आवश्यकता असते.
◆ या योजनेमध्ये आंबा, काजू, पेरु, लिंबू, नारळ, बोर, सीताफळ, आवळा, चिंच, कवठ, जांभूळ, कोकम, फणस, बांबू, करंज, जट्रोपा, साग, गिरिपुष्प, सोनचाफा, कडीपत्ता, कडुलिंब, शिंदी रोपे, शेवगा व हादगा (औषधी वनस्पती – अर्जुन, आसान, अशोका, बेहडा, बेल, हिरडा, टेवू, डिकेमाली, रत्त चंदन, रिठा, लोध्रा, आईरन, शिवन, गुग्गुळ, वावडिंग, बिब्बा रोपे ) आदी कलम व रोपे यांचा समावेश करण्यात आला आहे.
◆ या योजनेचा कालावधी माहे एप्रिल ते नोव्हेंबर असुन यामध्ये जमीन तयार करणे, खड्डे खोदणे, कलमे लागवड करणे, काटेरी कुंपण करणे, आंतरमशागत करून खत देणे तसेच पिक संरक्षण करून पाणी देणे या बाबींकरीता अनुदान देण्यात येतो.
◆ अनुसूचित जाती, अनुसुचीत जमाती, दारीद्र रेषेखालील लाभार्थी, भु-सुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी, अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वनवासी (वन हक्क मान्य असलेले) अधिनियम, 2006 खालील लाभार्थी, कृषी कर्ज माफी योजना, 2008 यामध्ये व्याख्या केलेल्या लहान व सीमांत भूधारक शेतकरी यांना प्राधान्य देण्यात येईल.
3 वर्षांसाठी पुढील प्रमाणे प्रती हेक्टर अनुदान
◆ आंबा कलमे लागवड (हेक्टरी 100 झाडे) – रु.1 लाख 61 हजार 260, काजू कलमे लागवड (हेक्टरी 200 झाडे ) – रु.1 लाख 14 हजार 725. नारळ रोपे बाणावली लागवड (हेक्टरी 150 झाडे) -रु.1 लाख 34 हजार 492, नारळ रोपे टी/डी लागवड ( हेक्टरी 150 झाडे ) रु.1 लाख 44 हजार 762, चिकू कलमे लागवड (हेक्टरी 100 झाडे ) – रु.1 लाख 58 हजार 890, जांभूळ रोपे लागवड (हेक्टरी 100 झाडे ) रु.96 हजार 570.
◆ या योजनेत सहभागी व्हायचे आहे त्यांना सहभागी होण्यासाठी गुगल फॉर्म ची लिंक तयार करण्यात आली असून शेतकर्यांनी त्यावर नाव नोंदणी केल्यास त्यांना सहभागी करून घेण्यासाठी 24 तासात कृषी विभागामार्फत संपर्क साधला जाईल. आतापर्यंत या माध्यमातून 1 हजार 200 शेतकर्यांनी अर्ज केले आहेत. https://sites.google.com/site/gramapanchayatashta/yojana/mahatma-gandhi-rastriya-gramina-rojagara-hami-yojana
◆ कोंकण विभागातील बहुसंख्य शेतकर्यांनी आपले कार्यक्षेत्रातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड योजनेचा लाभ मिळण्याकरीता योजनेत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे.
◆ कोकण विभागात सद्यस्थितीत कोंकण कृषी विभागाअंतर्गत 58 लाख 46 हजार 135 इतकी कलमे रोपे उपलब्ध करण्यात आली आहेत. करिता अवघ्या 20 हजार 994 शेतकर्यांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त बागायतदार आणि शेतकर्यांनी या योजनेची माहिती प्रत्यक्ष घेवून लाभ घेणे आवश्यक आहे.
Post a Comment