कोव्हिड 19 व निर्सग चक्री वादळात समाजभीमुख कामगीरी केल्याबद्दल शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करून सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानने केली सामाजिक बांधीलकी आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे होत आहे कौतुक.
संजय खांबेटे : म्हसळा
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना महामारी काळात व निसर्ग चक्रीवादळ या भीषण परिस्थितीत अहोरात्र मेहनत घेऊन म्हसळा तालुक्यातील शासनाचे विविध अधिकारी व कर्मचारी यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे कृतज्ञता पूर्वक सन्मान सोहळा संपन्न झाला.म्हसळा न्यु इंग्लिश स्कूल येथील सभागृहात संपन्न कार्यक्रमाला जि.प कृषि सभापती बबन मनवे,नगराध्यक्षा जयश्री कापरे,उप नगराध्यक्ष शोहेब हलदे,म्हसळा प.स. सभापती उज्वला सावंत,उपसभापती मधुकर गायकर,तालुका अध्यक्ष समीर बनकर,माजी सभापती नाझीम हसवारे, तहसीलदार शरद गोसावी,पोलिस निरीक्षक धनंजय पोरे,वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश मेहता, गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे,माजी सभापती छाया म्हात्रे,माजी उप सभापती संदीप चाचले,महिला अध्यक्षा रेश्मा कानसे,माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे,प्रकल्प अधिकारी व्यंकट तरवडे,पाणी पुरवठा अभियंता युवराज गांगुर्डे, सहा. ग.वि.अप्रदीप डोलारे,पोलिस उपनिरीक्षक दिपक ठुस,ा.आ.केंद्रम्हसळा डॉ.सागर काटे,
अभियंता अशोक कोकरे, मंडळ अधिकारी दत्ता करचे, सलीम शहा,तलाठी कैलास पाटील, मच्छिंद्र पाटील, भाऊ विरकुड,अनिल बसवत,चंद्रकांत कापरे,शाहिद उकये,महेश घोले,मंगेश कदम,सुर्यवंशीसर आदि मान्यवर उपस्थित होते.आयोजित सत्कार सोहळ्यात म्हसळा तालुक्यातील तहसिल कार्यालय,महसूल विभाग,पोलीस,जि.प .ग्रा.पाणी पुरवठा,आरोग्य सेवा,तालुका प्रकल्प कार्यालयातील प्रमुख अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल आणि सन्मानचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला.सन्मानाला उत्तर देताना पीआय धनंजय पोरे यांनी सर्वांचे सहकार्याने आम्ही केलेल्या कार्याचे कौतुक झाले त्याचे धन्यवाद व्यक्त केले.ग्रामीण रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ.महेश मेहता यांनी म्हसळा तालुक्यात सापडलेल्या कोरोना बाधितांमध्ये 70% शासनाचेच कर्मचारी आहेत.तालुक्यातून कोरोना संपविण्यासाठी घाबरून न जाता जर कोणा रुग्णाला कोरोनाचे लक्षण असतील तर त्यांनी घरी न थांबता स्वतःची आरोग्य चाचणी करून घेतली पाहिजे अन्यथा पुढे कोरोना प्रादुर्भावावर वेळीच मात करणे कठीण होईल अशी भीती व्यक्त केली. तहसीलदार शरद गोसावी यांनी आजचा सन्मान हा आनंददायी आहे.तालुक्यातील शासनाचे सर्व खात्याचे सहकारी अधिकारी आणि कर्मचारी यांनी चार महिन्यांतील कार्यरत कोरोनाकाळ आणि 3 जुनच्या चक्रीवादळात जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि शासन स्तरावर सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपापले दिलेले योगदान आणि करीत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. कोरोनाच्या आजाराने मृत्यू पावलेल्या नागरिकांना व शासकीय कर्मचारी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्वांनी वाढदिवसाच्या निमित्ताने सुयश चिंतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष समीर बनकर यांनी केले.
Post a Comment