म्हसळा : सहाय्यक गट विकास अधिकाऱ्यानी घेतला गट शिक्षण अधिकाऱ्यांचा पदभार

म्हसळा शिक्षण विभागाचे रिक्त पदांचे डोलाऱ्यासह : सहाय्यक गट विकास अधिकाऱ्यानी घेतला गट शिक्षण अधिकाऱ्यांचा पदभार. अव्हान पेलण्यासाठी तालुक्यातून शुभेच्छा.

संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतून ५०% कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.तालुक्यातील पंचायत समितीचे सहाय्यक ग.वि.अधिकारी प्रदीप डोलारे याना शिक्षण विभागातील रिक्त असलेल्या गट शिक्षण अधिकारी पदाची आतिरीक्त जबाबदारी दिल्याने त्यांच्यावर दोन विभागाचे कामकाजाचा भार रहाणार आहे.तालुक्यातील शिक्षण विभागांतीत आव्हाने पेलण्यासाठी तालुक्यातील लोकप्रती - निधी, शालेय व्यवस्थापन समिती, सरपंच अशा सर्वच स्थरांतून शुभेच्छा येत आहेत.
तालुका शिक्षण विभागांत प्राथमिक शाळा १००, माध्यमिक शाळा २० आहेत.हा शिक्षणाचा डोलारा सांभाळ्यासाठी शिक्षण विभाग रिक्त पदांचा भार घेऊन चालत आहे.तालुका शिक्षण विभागांत गटशिक्षणाधिकारी, कानिष्ठ विस्तार अधिकारी, शालेय पोषण अधिक्षक, केंद्रप्रमुख ६, मुख्याध्या- पक ५ पदवीधर विषय शिक्षक ५३, उपशिक्षक १७, शिक्षक ७५ पदे अशी १५५ पदे रिक्त आहेत. तर माध्यमिकशिक्षण विभागासाठी तालुका स्तरावर स्वतंत्र यंत्रणा नाही. प्राथमिक शिक्षण विभागाचीच यंत्रणा वापरली जाते. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ही पदे भरणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहेत.

म्हसळयांतील शिक्षण व्यवस्थेतील आव्हाने.
निर्सग चक्रीवादळामुळे बहुतांश शाळांची छप्पर नादुरुस्त झाली आहेत.आॅनलाईन पद्धतीने शैक्षणिक सत्राबाबतच्या तयारीचा आढावा घेणे व उणिवा आभ्यास करणे.,शिक्षकाची पदे रिक्त असल्यामुळे आदिवासी भागांतील व दुर्गम वस्ती असलेल्या शाळांवर लक्ष केंद्रीत करणे. कमी पटसंख्या असणा-या शाळांमध्ये अधिक शिक्षक कार्यरत आहेत तर जास्त पट संख्या असणा-या शाळांमध्ये कमी शिक्षक ही तफावत दूर करणे,त्याचप्रमाणे दहा ते पंधरा मुलांची पट संख्या असलेल्या शाळाचे समायोजन करणे. बहुतांश शिक्षक व अधिकारी मुख्यालयाचे ठीकाणी रहात नसल्यामुळे दांडी बहादर, लेट लतिफ कर्मचाऱ्यांवर विशेष लक्ष देणे अशा महत्वाच्या उपाययोजना करणे तालुक्यातील शिक्षण प्रेमी जनतेला अपेक्षीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा