तळा (किशोर पितळे)
तालुक्यातील पिटसईकोंड येथील ३६ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली आहे.ही व्यक्ती दि.४ रोजी अलिबाग येथे फिजिकल चेकअप साठी गेला होता.दि.७पासून त्याला सर्दी,ताप तसेच श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने दि.१७ रोजी त्याचा स्वॅब तपासणीसाठी सब अर्बन डायग्नोस्टीक प्रा.ली लँब येथे पाठविण्यात आला असता दि.१८रोजी कोव्हिंड १९ रिपोर्ट पाँझेटीव्ह आला दि.२० रोजी प्रा.आरोग्य केंद्र तळा येथे रिपोर्ट आला. तसेच सदर व्यक्तीला होम आयसोलेशन करण्यात आले असून त्याच्या संपर्कात आलेल्या घरातील पाच जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.तालुक्यातील कोरोना बधितांची एकूण संख्या २३ झाली असून त्यातील १९ जण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत तर कोरोनामुळे २जणांचा मृत्यू झाला असून २ बाधितांवरऔषधोपचार सुरू आहे.रायगड मध्ये कोरोना बधितांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने १२ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला असून लॉकडाऊन काळात नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये,तसेच नेहमी मास्क चा वापर करावा कासव गतीने वाढ असली तरी कसा प्रसार होईल ते कळणार नाही.तरी देखील अजूनही जनता गांभीर्याने घेत नाही.त्यामुळे ग्रामीण भागात देखील कोरोना रोगाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे.याला रोखण्यासाठी स्वतःप्रयत्न केले तरच लवकर कोरोना मुक्त होऊ शकतो यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे.अशी माहिती तळा तहसील कार्यालयातून प्राप्त झाली आसून प्रशासनाने दिलेल्या सुचनाचे पालन करा. सुरक्षित रहा.आपल्या बरोबर इतरांची काळजी घ्या आवश्यक काम असेल तरच बाहेर पडा. प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
Post a Comment