म्हसळा -वार्ताहर
राज्य सभेचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभा सभापती मा.व्यंकय्या नायडू यांचे दालनात खासदारकीची शपथ घेतल्यानंतर "जय हिंद-जय महाराष्ट्र",जय भवानी-जय शिवाजी "अशी घोषणा दिली या घोषणाबाजी वर सभापती मा.व्यंकय्या नायडु यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना समज दिली होती.छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव घेतले म्हणुन सभापती महोदयांनी आक्षेप घेतला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान असल्याने त्याचे निषेधार्थ म्हसळा तालुका शिवसेना प्रमुख महादेव पाटील यांनी म्हसळा तहसीलदार शरद गोसावी यांना निवेदन देवुन जाहीर निषेध नोंदवला आहे.या वेळी त्यांचे समावेत तालुका संपर्क प्रमुख कृष्णा म्हात्रे,महिला आघाडी प्रमुख रीमा महामुनकर,निशा पाटील,उप विभाग प्रमुम हेमंत नाक्ती,शाखा प्रमुख संतोष सुर्वे,संघटक अनिल महामुनकर,तानाजी म्हात्रे, कल्पेश जैन,प्रदिप शितकर,नारायण पाटील,नरेश कातळकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.
Post a Comment